(संग्रहित फोटो)
लाईफस्टाईल : सध्या हिवाळ्याचा हंगाम सुरु आहे. बाहेर थंडीचा कडाका वाढत आहे आणि अशा या थंड हंगामात बाजारात विविध हंगामी फळे विक्रीस येत आहे. या फळांच्या सेवनाने तुमच्या शरीराला अनेक फायदे होऊ शकतात. 

यापैकी एक फळ, कंदमूळ म्हणजे रताळे. या रताळ्याला स्वीट पोटॅटो देखील म्हणतात. रताळे कच्चे, उकडून, भाजून किंवा त्यापासून एखादा चमचमीत पदार्थ बनवून खाण्यासाठी वापरतात. जातीनिहाय काही रताळे पांढरे, काही केशरी तर काही पिवळट रंगाचेही असतात. 

(संग्रहित फोटो)
मात्र, बाजारात ही कंदमुळे खरेदी करताना चांगली पाहून घ्यावीत. अनेकदा खोडून काढताना मार लागून किंवा जमिनीतील कीटकांच्या किडीमुळे हे कडू चवही देतात. कडू भाग काढून आपण हा पदार्थ सहजतेने खाऊ शकतो. आरोग्याच्या बाबतीत याचे अनेक पोषक फायदे आहेत. चला तर जाणून घेऊया या फायद्यांविषयी

(संग्रहित फोटो)
रताळ्याचे फायदे :- हिवाळ्यात रताळे सेवन करणे खूप फायदेशीर आहे. कंदमूळे आणि फळे खाणे हिवाळ्यात अधिक फायदेशीर असतात कारण ते आपले शरीर आतून उबदार ठेवतात. रताळ्याच्या गडद रंगात बीटा-कॅरोटीन आणि व्हिटामिन ए, कॅरोटीनोइड्स जास्त प्रमाणात आढळतात. रताळ्यात फायबर आढळतात म्हणून फायबर वाढवण्यासाठी रताळे खावे. 

(संग्रहित फोटो)
100 ग्रॅम रताळ्यामध्ये 400 टक्क्यांपेक्षा जास्त जीवनसत्व आढळतात. रताळ्यात लोह, फोलेट, तांबे, मॅग्नेशियम आणि जीवनसत्त्वे असतात, जे तुमची रोगप्रतिकार शक्ती बळकट करतात. हे खाल्ल्याने तुमची त्वचा चमकदार होते. रतळ्यामधे व्हिटॅमिन ‘बी’ आणि व्हिटॅमिन ‘सी’ जास्त प्रमाणात आढळतात. रताळ्याच्या नियमित सेवनाने डोळ्यांच्या तक्रारी कमी होतात, रातांधळेपणाचा धोका कमी होतो. तसेच, रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी रताळी फायदेशीर आहेत.