(संग्रहित फोटो)
आला उन्हाळा, तब्येत सांभाळा, असे म्हटले जाते ते उगाच नव्हे. घसा कोरडा पडणे, मळमळ होणे, डायरिया, अपचन, खूप घाम, थकवा येणे इ. समस्या उन्हाळ्यात होणे सामान्य गोष्ट आहे. या वातावरणात उपाय म्हणून काही खातानाही बरीच काळजी घ्यावी लागते. अनेक फळे खाऊन आपणाला उकाड्यापासून आराम मिळवता येतो. पण ते फळ किती आरोग्यदायी आहे हे आपण आधी जाणून घ्यायला हवे.

(संग्रहित फोटो)
कलिंगड : उन्हाळ्याचा हंगामात त्वचेची आणि शरीराची विशेष काळजी घ्यावी लागते. कलिंगड हे उन्हाळ्याचे फळ आहे जे फक्त खायलाच नाही तर आपल्या शरीरास हायड्रेटदेखील करते. उन्हाळ्यात उपलब्ध असलेले हे फळ आपल्या शरीराला केवळ आवश्यक पोषक आहार देत नाही तर पाण्याचे अभाव देखील पूर्ण करते. याशिवाय अनेक आजारांमध्येही कलिंगड प्रभावी आहे. कलिंगड खाल्ल्याने तुमचे हृदय मजबूत राहते. तसेच तुमचे बॅड कोलेस्ट्रॉल कमी होते. तसेच हे खाल्ल्याने बद्धकोष्ठता होत नाही. याशिवाय आपल्या शरीरात रक्ताची कमतरता देखील संपते.

(संग्रहित फोटो)
नारळ पाणी : नारळ पाणी पिणे देखील आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. पोटातील सर्व प्रकारच्या आजारापासून आपले संरक्षण करण्यासाठी आणि आपल्याला थंड ठेवण्याचे कार्य नारळ पाणी करते. म्हणूनच, या हंगामात आपण नारळाच्या पाण्याचे सेवन केले पाहिजे.

(संग्रहित फोटो)
काकडी : काकडीमध्ये बरेच पौष्टिक पदार्थ आढळतात. ज्यामुळे शरीरातील रक्तामध्ये साखरेचे पातळी नियंत्रण राहते. म्हणूनच काकडी खाल्ल्याने मधुमेहावरही नियंत्रण मिळते. म्हणून उन्हाळ्यात काकडी खाण्याचा सल्ला दिला जातो. उन्हाळ्यात तर काकडी जास्तीत जास्त खाल्ली पाहिजे. कारण काकडीमध्ये 80 टक्के पाणी आढळते, ज्यामुळे काकडी खाल्ल्याने आपल्या शरीरात पुरेसे पाणी मिळते. याशिवाय काकडीमध्येही जीवनसत्त्वे आढळतात.

(संग्रहित फोटो)
दही : दह्यामध्ये प्रथिने, कॅल्शियम, रायबोफ्लेविन, व्हिटॅमिन बी 6 आणि व्हिटॅमिन बी 12 सारखी पोषक तत्वे असतात. जर आपण सौंदर्याबद्दल बोलत असाल तर चेहर्‍यावर दही वापरल्यास सनबर्न, टॅनिंग, मुरुम, डाग आणि कोरडे त्वचा आणि सुरकुत्या दूर होतात. दही थंड आहे, ज्यामुळे ते गॅस आणि अपचन यासारख्या समस्यांपासून मुक्तता देते तसेच पचनक्रिया सुधारते, तोंडाचे अल्सर बरे करण्यास, पोटाची उष्णता कमी करणे, वजन कमी करणे आणि रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासही दही मदत करते. 

(संग्रहित फोटो)
ऊसाचा रस : ऊसाचा रस गोड, थंड आहे. तत्काळ शक्ती देणारा, तरीही कमी कॅलरी असणारा आहे. वजन कमी करू इच्छिणा-यांसाठी हे उत्तम पेय आहे. मधुमेह असणा-या व्यक्त्तींनी साखरेऐवजी ऊसाच्या रसाचा वापर करावा.  

(संग्रहित फोटो)
कैरीचं पन्ह : उन्हाळ्यात कैरीचं पन्ह पिल्याने खूप लाभ होतो. उन्हाळ्यात घामामुळे शरीरातील पाणी आणि क्षार कमी होऊन थकवा जाणवतो यावर कैरीचे पन्हं पिणे हा उत्तम उपाय आहे. पन्हं प्यायल्यामुळे उन्हाचा त्रास खूपच कमी होतो.

(संग्रहित फोटो)
मोसंबी : उन्हाळ्यात मोसंबीचे ज्यूस पिणे आरोग्दायी आहे. यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असल्यामुळे शरीराला उर्जा मिळते. मोसंबी ज्यूसमुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत मिळते.