(संग्रहित फोटो)

लाइफ स्टाइल - आज जवळजवळ प्रत्येक व्यक्तीकडे स्मार्टफोन आहे आणि मोबाइल तंत्रज्ञानाने आयुष्यात बर्याच सोयीसुविधा वाढवल्या आहेत. मात्र प्रत्येक गोष्टीचे जसे फायदे असतात, तसेच तोटेही असतात. याच प्रकारे मोबाइल तंत्रज्ञानाचे काही तोटे देखील आहेत, जे जाणून घेणे फार महत्वाचे आहे. अन्यथा यामुळे पुढे जाऊन अनेक गंभीर समस्या उद्भवू शकते. स्मार्टफोनमधून निघणारे रेडिएशन लोकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम करतो. मोबाईल रेडिएशनचा परिणाम सर्वात आधी डोळ्यांची जळजळ आणि झोप न येण्याची समस्यांपासून सुरु होतो. या विषयाबद्दल अनेक तज्ज्ञांचे मत आहे की, फोन चुकीच्या ठिकाणी ठेवल्यानेही आपण अनेक रोगांना बळी पडू शकतो.

(संग्रहित फोटो)

मागच्या खिशात कधीही ठेवू नका मोबाइल
बर्याच जणांना पँटच्या मागच्या खिशात मोबाईल ठेवण्याची सवय असते. वैद्यकीय तज्ञांच्या मते असे करू नये, कारण फोन तुटण्याचा किंवा चोरीचा धोका वाढतो. यासोबतच पायाच्या नसावर वाईट परिणाम होतो. ज्यामुळे तुमचे पाय दुखू शकतात. तसेच फोनला मागील खिशात ठेवल्यास पाठदुखीचा त्रास देखील होऊ शकतो.

(संग्रहित फोटो)

उशाखाली ठेवू नका मोबाईल
बरेच लोक रात्री झोपताना आपला मोबाईल उशाखाली ठेवून झोपतात. असे कधीही करू नये, कारण यामुळे फोनमधून उत्सर्जित होणार्‍या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनमुळे डोकेदुखीची समस्या उद्भवू शकते. सोबत चक्कर येण्यासारखी समस्या देखील होऊ शकते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, फोनमधून निघणारे रेडिएशन मानवांसाठी अत्यंत हानिकारक आहे.

(संग्रहित फोटो)

फोनवर बोलताना घ्या या खबरदारी
फोनवर बोलत असताना, मोबाईल डिव्हाइस कानाशी जास्त चिटकून बोलू नका. मोबाईल कानापासून किमान 0.5 ते 1.5 सेंटीमीटर दूर ठेवावा. असे केल्याने फोनच्या स्क्रीनवर उपस्थित बॅक्टेरिया त्वचेच्या संपर्कात येत नाहीत. तसेच कॉलिंग दरम्यान मोबाईलचे रेडिएशन अधिक वाढलेले असते, जे आपल्यासाठी हानिकारक आहे.