(संग्रहित फोटो)
कामाच्या तणावामुळे आणि इतर कारणांमुळे शरीरात आणि डोक्यात वेदना होते. बरेच औषधे घेऊन देखील आराम पडत नाही, तर त्या वेदनाशामक गोळ्या खाल्ल्याने शरीरावर इजा होते. शरीरात वेदना असल्यास काही घरगुती अवलंबवा जेणे करून शरीराला कोणतीही हानी होणार नाही आणि वेदनां पासून मुक्ती मिळते. चला तर मग हे घरगुती उपाय काय आहे जाणून घेऊ या.

(संग्रहित फोटो)
लवंग : लवंग प्रत्येक घरात आढळते. दातदुखी एकाएकी उद्भवते. अशा परिस्थितीत औषधे मिळणे कठीण होते. दातदुखी साठी लवंगाचे तेल फायदेशीर आहे. घरात लवंगाचे तेल नसल्यास, लवंगा दाताखाली दाबल्याने वेदना कमी होते. घसा खवखवणे आणि घशात दुखण्यावर देखील लवंग प्रभावी आहे.

(संग्रहित फोटो)
काळा चहा किंवा ब्लॅक टी : कामाचा ताण आणि थकव्यामुळे होणार्‍या वेदनेला कमी करण्यासाठी काळा चहा प्यावा. नंतर डोळे मिटून पडावे. डोकेदुखीपासून आराम मिळेल आणि थकवा दूर होईल. काळा चहा आवडत नसेल तर या चहा मध्ये दूध घालून प्यावे.

(संग्रहित फोटो)
हळदीचे दूध : काम केल्यावर थकवा आणि कंटाळा आला असल्यास आणि या मुळे शरीरात वेदना जाणवत असल्यास वेदना शामक औषधे घेण्या ऐवजी हळद घालून कोमट दूध प्यावे. थोड्या वेळासाठी झोपा. उठल्यावर आपण ताजे तवाने व्हाल. आणि शरीरातील सर्व वेदना देखील दूर होतील.

(संग्रहित फोटो)

तेलाने मॉलिश करा : एनिसीड ऑइल, लव्हेंडर तेल, लवंगाचे तेल, लेमन ग्रास तेल, हे सर्व तेल वेदनांपासून आराम देण्यात प्रभावी आहेत. शरीरात जडपणा, वेदना, पेटके जाणवत असल्यास या पैकी कोणत्याही तेलाने शरीराची मॉलिश केल्यावर स्नायूंना आराम मिळतो. या मुळे काहीच वेळात शरीराची वेदना दूर होतें.