(संग्रहित फोटो)
लाईफस्टाईल : दररोज काही योजना आखावी म्हणजे आपल्या त्वचेची काळजी घ्यावी, तेव्हाच आपली त्वचा निरोगी राहील आणि आपण सुंदर दिसाल. यासाठी काही ब्युटी टिप्सचा अवलंब करावा.

क्लिंझिंग : त्वचेवर धूळ माती घाण आणि घाम आल्यामुळे त्वचेचे छिद्र बंद होतात. त्वचेच्या संरक्षणासाठी फेसवॉश वापरावे. या मुळे बंद झालेले छिद्र उघडतात. त्वचा मोकळ्या पणाने श्वास घेते आणि निरोगी राहते. 

दररोज दिवसातून दोन वेळा फेसवॉशने चेहरा स्वच्छ धुवा, सकाळी अंघोळीच्या वेळी आणि संध्याकाळी बाहेरून आल्यावर. असं केल्याने छिद्र उघडतात. फेसवॉशची निवड त्वचेप्रमाणे असावी.  

(संग्रहित फोटो)
चेहर्‍याची त्वचा कोरडी आहे तर मिल्क, क्रीम किंवा ऑइल बेस्ड फेसवॉश वापरा. आणि त्यात पीएचची पातळी देखील तपासून बघा.  

(संग्रहित फोटो)
तेलकट त्वचा असल्यास जेल असलेले फेसवॉश वापरा आणि तपासून बघा की ह्या फेसवॉशमध्ये सॅलिसिलिक ऍसिड आहे किंवा नाही. अंघोळीला सामान्य साबणाऐवजी ट्रान्स्परंट जेल वापरा. साबणाने त्वचा कोरडी पडते. परंतु जेल वापरल्याने त्वचा मऊ होते.  

(संग्रहित फोटो)
चेहर्‍यावर दोन वेळाच फेसवॉश लावा. त्यापेक्षा अधिक वेळा लावू नका. यामुळे त्वचेमधील नैसर्गिक तेल निघून जाते 
आणि त्वचा कोरडी पडते.

111 (4)

(संग्रहित फोटो)
चेहरा धुताना आपण चेहऱ्यावरुन काहीवेळा हात फिरवतो. त्यामुळे याठिकाणच्या पेशी कार्यरत होतात आणि तेथील रक्ताभिसरण क्रिया सुधारण्यास मदत होते. रक्ताभिसरण चांगले झाल्यास त्वचेवर एक वेगळाच ग्लो येतो.

(संग्रहित फोटो)