(संग्रहित फोटो)
लाईफस्टाईल :  बर्‍याच लोकांची सवय असते सकाळी उठल्यावर चहा पिण्याची. काही लोकांना तर पलंगावरच चहा लागतो. पण ही सवय चुकीची आहे. जर आपण देखील आपल्या दिवसाची सुरुवात चहा घेऊन करता तर ही सवय लगेच बदला. अनाशापोटी चहा घेतल्यानं शरीराला नुकसान होत. चला तर मग जाणून घेऊ या.

(संग्रहित फोटो)
पचनाशी निगडित समस्या उद्भवतात : सकाळी उठल्यावर अनाशापोटी चहा प्यायल्यानं पचनाशी निगडित समस्या उद्भवतात. आतड्याचे बेक्टेरिया पचन तंत्राला बळकट करण्याचे काम करतात. अनाशापोटी चहा प्यायल्यानं आतड्या बेक्टेरियाला नुकसान होते, ज्यामुळे पचनाशी निगडित समस्या उद्भवतात.

(संग्रहित फोटो)
तोंडाचा वास येतो : सकाळी अनाशापोटी चहाचे सेवन केल्यानं तोंडाच्या आरोग्याला देखील नुकसान होतो. या मुळे तोंडातून घाण वास येतो. जर आपल्याला देखील ही सवय आहे. तर ही सवय लगेच बदला.

(संग्रहित फोटो)
लघवी जास्त प्रमाणात येते : दिवसाची सुरुवात चहा ने करणार्‍यांना लघवी जास्त प्रमाणात येऊ लागते. लघवी जास्त प्रमाणात येऊ लागल्यानं शरीरात पाण्याची कमतरता होऊ लागते. या मुळे अनेक समस्यांना सामोरी जावे लागते.

(संग्रहित फोटो)
पोट स्वच्छ होत नाही : चहा मध्ये कॅफीनचे प्रमाण जास्त असतात आणि कॅफीनच्या सेवनाने दिवसाची सुरुवात करणे चांगले नाही. सकाळी अनाशापोटी चहा प्यायल्यानं पोट चांगल्या प्रकाराने स्वच्छ होत नाही. पोट स्वच्छ न झाल्यामुळे आजारी पडण्याचा धोका संभवतो. निरोगी राहण्यासाठी पोट स्वच्छ असणे महत्त्वाचे आहे. ऍसिडिटीचा त्रास होतो-सकाळी अनाशापोटी चहा प्यायल्यानं ऍसिडिटीची समस्या होते. जर आपण देखील सकाळी उठल्यावर चहा पिण्याची आवड ठेवता तर आजच ही सवय सोडा.