(संग्रहित फोटो)

लाईफस्टाईल - सेल्फी काढत नाही, अशी व्यक्ती सध्या शोधूनही सापडणार नाही. सध्या तर सेल्फीचे वेड आबालवृद्धांना जडल्याचे दिसते. मोठ्या शहरांतून तर ’सेल्फी पॉईंट’ही विकसित केल्याचे आढळते. सेल्फी म्हणजे काय? तर कोणाच्याही मदतीशिवाय स्वतःचा फोटो काढणे. कुठेतरी फिरायला जाण्याचा किंवा काही मित्र-मैत्रिणी किंवा ओळखीच्या लोकांना भेटण्याचा प्लॅन बनतो, तेव्हा सगळे जमल्यावर सेल्फी घेण्याचा सोहळाच सुरू होतो. त्याचप्रमाणे कित्येक लोक तासन् तास, हजारो सेल्फी काढत असतात. मात्र, आरोग्याच्या दृष्टीने हे हानिकारक आहे. जर, तुम्हालाही सतत सेल्फी घेण्याची आवड असेल, तर लवकरात लवकर या सवयीला रामराम ठोका, कारण जास्त सेल्फी काढण्याची सवय तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते.

1.सतत सेल्फी काढण्याची सवय तुम्हाला तुमच्या वयापेक्षा लवकर वयस्कर बनवते. तसेच ही सेल्फी तुमच्या अनेक आजारांना कारणीभूत देखील ठरू शकते.

(संग्रहित फोटो)

2. सेल्फी  घेण्याची सवय तुम्हाला ओसीडीचा रुग्ण बनवू शकते. ओसीडी हा ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर आहे. आजकाल अनेक तरुणांमध्ये ही समस्या वाढत आहे. यात एखाद्या व्यक्तीला सेल्फी घेण्याची व्यसन लागते. ओसीडी झालेल्या रुग्णाचे मन त्याला वारंवार कुठेतरी जाऊन सेल्फी घेण्यास भाग पाडते.

(संग्रहित फोटो)

3. सेल्फी  काढण्यामुळे ऍक्यूट सेल्फाइटिसची समस्या देखील सध्या अनेक तरूणांमध्ये दिसून येत आहे. यात एखाद्या व्यक्तीला दिवसातून तीन ते चार वेळा सेल्फी  घेण्याची इच्छा होत राहते. त्याचबरोबर वारंवार सोशल मीडियावर फोटो पोस्ट करण्याची आणि सोशल मीडियावरील कमेंट वाचण्याची सवय लागते.

(संग्रहित फोटो)

4. सेल्फी घेताना चेहर्‍यावर निळा प्रकाश आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन त्वचेसाठी खूप हानिकारक ठरू शकते. सेल्फी घेताना सनस्क्रीन लेयर मोबाईलमधून बाहेर पडणार्‍या किरणोत्सर्गास रोखू शकत नाही. 
यामुळे त्वचेचे नुकसान देखील होऊ शकते.

(संग्रहित फोटो)

5. सेल्फी  काढण्याच्या सवयीमुळे वय देखील वेगाने वाढत असल्यासारखे वाटते. तरुण वयात एखादा व्यक्ती वृद्धत्वाकडे झुकल्यासारखा दिसू लागतो. या सवयीमुळे आपल्या चेहर्यावर अकाली सुरकुत्या पडू लागतात, ज्यामुळे आपण अकाली म्हातारे वाटू शकता.

(संग्रहित फोटो)

6. सेल्फी घेताना मोबाईलमधून निघणार्‍या हानिकारक रेडिएशनचा परिणाम त्वचेमध्ये असलेल्या डीएनएवरही होतो. ज्यामुळे त्वचा निस्तेज होऊन, तिची पुन्हा सजीव होण्याची क्षमता प्रभावित होते.

(संग्रहित फोटो)