(संग्रहित फोटो)

शिवपूजेत बेलपत्र म्हणजे बेलाचे पान फार महत्वाचे मानले जाते. शंकराचे बेलपत्र हे आवडते पत्र मानले गेले आहे. बेलाची झाडे भारतात सर्वत्र आढळतात. उंच वाढणारा बेलवृक्ष औषधी गुणधर्म असलेला वृक्ष आहे. बेलपत्राची महती देवापुरती सीमित नसून, त्याला वैद्यकीय महत्त्वसुद्धा असल्याचे आयुर्वेदाने अधोरेखित केले आहे. बेलाची पाने, फळे औषधी गुणधर्माने युक्त आहेत. संशोधनातून सुद्धा ही बाब आता सिद्ध झालेली आहे. चला तर मग जाणून घेऊया बेलपत्राचे काही गुणकारी फायदे...

(संग्रहित फोटो)
बेलाची पाने कशाकशावर उपयुक्त आहेत याची माहिती येथे देत आहोत. विशेषतः मधुमेही लोकांना या पानांच्या सेवनाने फायदा होतो. ही पाने ज्वर म्हणजे ताप येत असेल तर गुणकारी आहेत. मधमाशी अथवा अन्य कीटकांनी चावा घेतला तर या पानांचा रस लगेच वेदना थांबवितो. तसेच बेलाची फळे सरबतात वापरली जातात. बेल फळांचा मुरंबा उष्णता कमी करणारा आहे.

(संग्रहित फोटो)
बेलपत्रे अँटीऑक्सिडंट असून त्यात ए,सी, बी 1, बी 6 आणि बी 12 जीवनसत्व आहे. रायबोफ्लोबिन, खनिजे, पोटॅशियम, आणि फायबर्स या पानात भरपूर प्रमाणात मिळतात. बेलाच्या पानांचा वाटून चेहर्‍यावर लेप केला तर चेहरा ताजातवाना होतो शिवाय चेहर्‍यावरील डाग कमी होतात. 

(संग्रहित फोटो)
केस गळण्याचे कमी होते आणि केस दाट, चमकदार बनतात. पानांच्या सेवनाने मधुमेह, रक्तातील कोलेस्टेरॉल, हृदयाच्या आजारांपासून सुटका होते. उन्हाळ्यात बेलफळाचे सरबत शरीराचे तापमान नियंत्रित ठेवते. फळातील गर् काढून त्यात पाणी, लिंबू रस, पुदिना पाने आणि गरजेनुसार साखर घालून हे सरबत बनविले जाते.

(संग्रहित फोटो)
हृदयरोगावर बेलपत्र औषधी मानले जाते. बेलपत्राचा काढा प्यायल्याने रक्ताभिसरण उत्तम होते. नवीन रक्त तयार होण्यास मदत होते.

(संग्रहित फोटो)
अनेकांना रक्ताच्या कमरतेची लक्षणे दिसून येतात. वाळलेल्या बेलाच्या गराचा पावडर तयार करून गरम दुधात मिश्रीसोबत रोज एक चमचा घेतल्यास शरीरात नवीन रक्त तयार होण्यास सुरुवात होते.