मुंबई - बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या दोन स्टाफ मेंबर्सना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे सलमानने स्वत:ला आयसोलेट करुन घेतल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बॉलिवूडच्या भाईजानच्या घरात कोरोनाची एंट्री झाली आहे. त्याच्या ड्रायव्हर अशोक आणि आणखी एका स्टाफ मेंबरला कोरोनाची लागण झाल्याने सलमानने स्वत:ला आयसोलेट केले आहे. तसेच संपूर्ण खान कुटुंब देखील क्वारंटाईन झाले आहे. सलमान सध्या 'बिग बॉस'चे 14वे पर्व होस्ट करत आहे. त्यामुळे तो आयसोलेट असल्याने आगामी एपिसोड्समध्ये तो दिसणार की नाही, हे पाहणे रंजक ठरणार आहे. सलमान खान पुढील १५ दिवसांसाठी क्वॉरंटाईन राहणार आहे. तसेच कोरोनाची लागण झालेल्या ड्रायव्हर आणि इतर स्टाफ मेंबर्सना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. रिपोर्टनुसार, सलीम खान आणि सलमा खान यांच्या वेडिंग अॅनवर्सरीचे सेलिब्रेशन देखील रद्द करण्यात आले आहे.

नुकतेच सलमान खानने त्याचा आगामी चित्रपट 'राधे'ची शुटींग सुरु केले. या चित्रपटात सलमानसोबत दिशा पाटनीदेखील दिसून येणार आहे. त्याच्या आयसोलेट होण्याने त्याच्या कामावरही मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. कारण, यावेळी सलमानच्या हातात अनेक प्रोजेक्ट्स आहेत. कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे चित्रपटाच्या चित्रिकरणांवर बंदी घातलेली होती. त्यानंतर अनलॉकमध्ये चित्रिकरणास परवानगी देण्यात आली. अशात कोरोनाने पुन्हा एकदा आपले पाय पसरवण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वीही अनेक कलाकारांना कोरोनाने ग्रासले आहे.