मुंबई - प्रसिद्ध अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा महाअक्षय वादात अडकला आहे. महाअक्षय चक्रवर्तीविरोधात मुंबईतील ओशिवरा ठाण्यात बलात्कार, फसवणूक आणि बळजबरीने गर्भपात करण्यास भाग पाडल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी मिथुन यांची पत्नी योगिता बाली यांच्यावरही धमकवल्याचा आरोप आहे. ही तक्रार एका महिला कलाकाराच्या आरोपाच्या आधारे दाखल करण्यात आली. या महिलेने सांगितले, ही आरोपीने 2015 ते 2018 पर्यंत मला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत बलात्कार केला. तक्रार करणारी महिला कलाकार ही हिंदी आणि भोजपूरी चित्रपटांत काम करत होती.

महिला कलकाराच्या तक्रारीनुसार, '2015 पासून ती आरोपी अभिनेता महाअक्षयसोबत नात्यात होती. त्यानंतर 2015 मध्ये महाअक्षयने तिला घरी बोलावून तिच्या ड्रिंकमध्ये नशेच्या गोळ्या टाकल्या. त्यानंतर तिच्यावर अत्याचार झाला. तेव्हापासून लग्नाते आमिष दाखवून महाअक्षय तिच्यावर बलात्कार करत राहिला.'

यादरम्यान ती गर्भवती झाली होती. त्यानंतर तिच्यावर महाअक्षय आणि त्याची आई योगिता बाली यांनी गर्भपात करण्यासाठी दबाव टाकला. त्यानंतर तिने नकार दिल्यावर तिचा जबरदस्तीने गर्भपात करण्यात आला. तिने या प्रकरणी त्यावेळी तक्रार देण्याचा प्रयत्न केला परंतु, तिची तक्रार दाखल करून घेतली नाही. या सर्व प्रकारावरून योगिता बाली आणि महाअक्षय यांनी तिला सतत धमकावून मानसिक त्रास दिला.

ओशिवरा पोलिसांच्या सांगण्यानुसार, महाक्षय आणि त्याची आई योगिता विरोधात कलम 376 (2) (N) (वारंवार त्याच महिलेवर बलात्कार करणे), 328 (विष देणे किंवा इतर पद्धतीने हानी पोहोचवणे), 417 (फसवणूक), 506 (धमकावणे), 313 (महिलेच्या संमतीशिवाय गर्भपात करणे) आणि कलम 34 अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

2018 मध्ये महिलेने महाअक्षयवर तक्रार दाखल केली होती. तिने दिल्लीच्या एका न्यालयात न्याय मागण्यासाठी धाव घेतली होती. कोर्टाने दिल्ली पोलिसांना तक्रार दाखल करून घेण्याचे आदेश दिले होते. परंतु नंतर कोर्टाने ही घटना जिथे घडली आहे, तेथील पोलीस याचा तपास करतील असे सांगितले होते.