मुंबई : कोरोनामुळे देशात हाहाकार उडाल्यानंतर आता देशभरातून राजकारणी आणि सरकारवर टीका केली जात आहे. दरम्यान मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता आस्ताद काळे याने देखील सरकार आणि राजकारण्यांवर ताशेरे ओढले आहेत. अस्तादने याबाबत इंस्टाग्रामवर केलेल्या पोस्टची सध्या चर्चा होत आहे.

आस्तादने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार, राज्य सरकार, राजकारणी यांना सवाल केला आहे. त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतेय.

काय आहे अस्तादची पोस्ट...
प्रश्न विचारायचे आहेत…स्वत्व जपायचं आहे….कदाचित जीव गमवावा लागू शकतो…कारण..श्शु!!! कुठे काही बोलायचं नाही….अरे हाड…..आम्ही प्रश्न विचारणार….सत्तेच्या आणि सत्तेतल्या प्रत्येकाला. उत्तरं न देता आम्हाला गप्प करू बघाल तर तुम्ही किती नागडे आहात तेच दिसणार…..नागडे राजकारणी…नागडं सरकार…नागडा देश….निरोप घेतो, असंही अस्तादने म्हटलं आहे. आस्ताद काळेच्या या पोस्टवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.

सध्याच्या घडीला निवडणूक घेणे महत्त्वाचे आहे की परिस्थिती आटोक्यात आणणे महत्त्वाचे आहे. परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सरकारकडे एक वर्षे होते. मग ते राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार..तुम्ही एका वर्षात केलंत काय ?, असा सवालही आस्तादने केला.

[removed][removed]