मुंबई : विनोदी अभिनेता भूषण कडूच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कोरोनामुळे भूषणच्या पत्नीचे निधन झालेय. काही दिवसांपूर्वीच भूषणची पत्नी कादंबरी कडू यांना कोरोनाची लागण झाली होती. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान ३९ व्या वर्षीय कादंबरी यांनी अखेरचा श्वास घेतला. 

काही दिवसांपूर्वीच कादंबरी कडू आणि भूषण कडू दोघांनाही कोरोनाची लागण झाली होती. भूषणची प्रकृती सुधारल्याने त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. तर कांदबरी यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना ठाण्यातील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यानंतर मुंबईतील केईएम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले. दूर्दैवाने २९ मेला कादंबरी यांनी अखेरचा श्वास घेतला. भूषण आणि कादंबरी यांना प्रकीर्त हा आठ वर्षांचा मुलगा आहे. भूषणत्या पत्नीच्या निधनानंतर अनेक मराठी कलाकारांनी सोशल मीडियावरून शोक व्यक्त केलाय. 

कांदबरी ही भूषणची दुसरी पत्नी होती. मराठी बिग बॉसच्या पहिल्या पर्वात अभिनेता भूषण कडू सहभागी झाला होता. यावेळी त्याची पत्नी कादंबरी आणि मुलगा भूषणच्या भेटीला आले होते. यावेळी बऱ्याद दिवसांनी आपल्या मुलाला पाहून भुषणच्या अश्रुंचा बांध फुटला होता. हा एपिसोड पाहून चाहते देखील भावूक झाले होते.

अभिनेता भूषण कडूने त्याच्या विनोदी शैलीने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केलेय. ‘कॉमेडी एक्स्प्रेस’ यासोबतच ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’, ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ अशा शोसोबतच भुषणने अनेक सिनेमांमधुन प्रेक्षकांचे मनोरंजन केलेय. मस्त चाललंय आमचं, , श्यामची मम्मी, भुताची शाळा, टारगेट अशा विविध कालकृतींमधून भूषणने प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले.