मुंबई : प्रसिद्ध बंगाली अभिनेते सौमित्र चटर्जी याचे निधन झाले आहे. ते ८५ वर्षांचे होते. सौमित्र चटर्जी यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना लाइफ स्पोर्टवर ठेवण्यात आले होते. परंतु, उपचारादरम्यान सौमित्र चटर्जी यांची प्राणज्योत मालवली आहे. सौमित्र चटर्जी यांनी रविवारी (दि.१५ नोव्हेंबर) रोजी दुपारी १२.१५ वाजता अखेरचा श्वास घेतला.

काही दिवसापूर्वी सौमित्र चटर्जी यांना करोनाची लागण झाली होती. त्यामुळे सौमित्र चटर्जी यांना ६ ऑक्टोबर रोजी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. सौमित्र चटर्जी यांच्यावर योग्य उपचार केल्यानंतर त्यांनी कोरोनाला हरवले होते.मात्र, त्यानंतर कोव्हिड एन्सेफॅलोपॅथी आणि कॉम्पिकेशन्समुळे त्यांची प्रकृती हळूहळू खालावली. सौमित्र चटर्जी यांच्या निधनामुळे चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनी सौमित्र चटर्जी यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

सौमित्र चटर्जी यांच करिअर? सौमित्र चटर्जी यांनी बंगाली कलाविश्व गाजवले होते. चटर्जी यांनी १९५९ मध्ये अपुर संसार या चित्रपटाच्या माध्यमातून करिअरची सुरुवात केली होती. प्रसिद्ध दिग्दर्शक सत्यजीत रे यांच्यासोबत त्यांनी जवळपास १४ चित्रपटांमध्ये काम केले आहे. विशेष म्हणजे फ्रान्समधील सर्वात मानाचा Ordre des Arts et des Lettres या पुरस्काराने चटर्जी यांना सन्मानित करण्यात आले आहे. चटर्जी यांना दादासाहेब फाळके पुरस्कारानेदेखील गौरविण्यात आले आहे. चटर्जी यांना तर ३ वेळा त्यांना राष्ट्रीय पुरस्कार, संगीत नाटक अकॅडमी पुरस्कार , ७ फिल्मफेअर व पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.