मुंबई - अभिनेता अक्षय कुमारच्या बहुचर्चित 'लक्ष्मी बॉम्ब' या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. आता ऐन रिलीजच्या वेळी चित्रपटाच्या नावात बदल करण्यात आला आहे. याबाबत चित्रपट विश्लेषक तरण आदर्श यांनी माहिती दिली आहे. चित्रपटाच्या नावाची घोषणा झाल्यापासून हे नाव वादात अडकले होत. त्यामुळे आता 'लक्ष्मी बॉम्ब'ऐवजी 'लक्ष्मी' इतकेत ठेवण्यात आले आहे.

करणी सेनेने चित्रपटाच्या 'लक्ष्मी बॉम्ब' नावावर आक्षेप घेत विरोध केला होता. तसेच श्री राजपूत करणी सेनेकडून वकील राघवेंद्र मेहरोत्र यांनी निर्मात्यांना याबाबत नोटीस पाठवली होती. निर्माते-दिग्दर्शकांनी जाणूनबुजून 'लक्ष्मी' हे नाव शिर्षकात वापरल्याचा या नोटीसमध्ये म्हटले आहे. हिंदू धर्मातील देवीदेवतांचा अपमान करुन धार्मिक भावना दुखावल्याचा आरोपही या नोटीसमध्ये केला आहे. चित्रपटाच्या नावात बदल करण्याची मागणी त्यांनी केली होती.

करणी सेनेने तीव्र विरोध केल्यानंतर अखेर चित्रपटाच्या टीमने या चित्रपटाच्या नावात बदल केला आहे. यातील 'बॉम्ब'
हा शब्द काढून आता फक्त 'लक्ष्मी' हे नाव ठेवण्यात आले आहे.

हा चित्रपट येत्या ९ नोव्हेंबरला डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. अक्षय कुमार आणि कियारा आडवाणी यांच्या यात मुख्य भूमिका आहेत.

[removed][removed]