मुंबई - बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या 'लक्ष्मी बॉम्ब' चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. परंतु या ट्रेलरवर प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

अक्षयच्या 'लक्ष्मी बॉम्ब' चित्रपटावर बंदी घालण्याची देखील मागणी प्रेक्षक करत आहेत. या चित्रपटात लक्ष्मी नावावरून प्रेक्षक संतापले आहेत. कारण हिंदु देवतांचा हा अपमान असल्याचे बोलले जात आहे. शिवाय यात हिंदू-मुस्लिम तरुणांचे प्रेमप्रकरण दाखवून लव्ह-जिहादचा प्रचार केल्याची टीका होत आहे.

चित्रपटात अक्षयच्या भूमिकेचे आसिफ तर अभिनेत्री कियारा अडवाणीच्या भूमिकेचे नाव प्रिया आहे. दिवाळीआधी रिलीज होत असलेला हा चित्रपट तामिळ सिनेमा 'कंचना'चा हिंदी रिमेक आहे. सोशल मीडियावर लोक म्हणताय, की 'कंचना' चित्रपटात मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेचे नाव राघव आहे, तर 'लक्ष्मी बॉम्ब'मध्ये अक्षयचे नाव आसिफ का? आणि अभिनेत्रीच्या भूमिकेचे प्रिया का ठेवले? या चित्रपटाला प्रेक्षक बॉयकॉट करत बंदी घालण्याची मागणी करत आहेत.

'लक्ष्मी बॉम्ब' हा चित्रपट 9 नोव्हेंबरला डिज्नी प्लस हॉटस्टारवर रिलीज होणार आहे. हा एक हॉरर-कॉमेडी चित्रपट आहे असून अक्षय कुमार आणि कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत आहेत.

चित्रपटाचा ट्रेलर...