मुंबई - राज्यातील अनेक निर्बंध शिथील करण्यात येत असताना आता धार्मिक स्थळे उघडण्याच्या मागण्यांनी जोर धरला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहून 'बार-रेस्टॉरंट सुरु झाले, देवच कुलुप बंद का? तुम्हाला हिंदुत्वाचा विसर पडला का? मंदिरे सुरु करु नये असे दैवी संकेत तुम्हाला मिळतात का?' असा सवाल केला.

त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'ठाकरे शैलीत' राज्यपालांना त्या पत्राचे उत्तर दिले. देशभरात यावरून चर्चा होत असतानाच आता अभिनेत्री कंगना रानौटने यात उडी घेतली आहे.

कंगनाने पुन्हा एकदा टि्वट करून ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. कंगनाने आपल्या टि्वटमध्ये म्हटले, 'गुंडा सरकारला राज्यपाल सरांनी प्रश्न विचारला हे पाहून मला समाधान वाटले. महाराष्ट्रातील गुंडा सरकारने बार आणि रेस्टॉरंट उघडायला परवानगी दिली परंतु मंदिरे बंद ठेवली. सोनिया सेना बाबर सेनेपेक्षाही वाईट वागत आहे.' असे टि्वट करत कंगनाने अगदी असभ्य भाषेत ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

कंगनाचे टि्वट...

[removed][removed]