मुंबई : देशात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. दररोज कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत चालली आहे. अनेकजण कोरोनाशी दोन हात करत आहेत. यामध्ये दिग्गजांचाही समावेश आहे. अनेक दिग्दर्शक, अभिनेते कोरोनाशी झुंज देत आहे. आता ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी देखील कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. मोहन जोशी यांना कोरोनाची लागण झाली आहे. मोहन जोशी यांनी स्वत: याची माहिती दिली.

सध्या ते घरीच आयसोलेशनमध्ये असल्याचे सांगितले जात आहे. घरात राहा आणि सुरक्षित राहा. मी कोरोना पॉझिटीव्ह आहे, अशी इन्स्टाग्रामवर स्टोरी मोहन जोशी यांनी शेअर केली आहे. मोहन जोशी यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोज घेतले आहेत.

मोहन जोशी सध्या ‘अग्गंबाई सूनबाई’ या लोकप्रिय मालिकेत काम करत आहेत. मोहन जोशीही शूटींगनिमित्ताने गोव्यात होते. मात्र गोव्यात कोरोनाचा संसर्ग वाढताच एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवाने राज्यात शूटींगची परवानगी नाकारली. यानंतर नुकतीच मालिकेची अख्खी टीम मुंबईला परतली होती.