मुंबई : कोरोना संकटाच्या काळात परिस्थितीने फटका तर बसलाच परंतु अनेकांनी कोरोना रुग्णांच्या नातेनाईकांची लुटमारही केली. या काळात काहींच्या कृतीतून माणुसकीचे दर्शन झाले तर काही ठिकाणी मयताच्या टाळूवरचे लोणी खाण्यासारख्याघटना घडल्या. सध्या ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे अनेकांना आपला प्राण गमवावा लागला आहे. तर रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असल्यामुळे या इंजेक्शनचा मोठा काळाबाजार होत आहेत, असे अनेक प्रकरणे समोर आली आहेत.

कोरोना संकटाच्या काळात औषधांच्या होणाऱ्या काळाबाजारवरून प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुखने संताप व्यक्त केलाय. औषधांचा काळाबाजार करणार्‍यांना भर रस्त्यात चोपले पाहिजे, असे रितेश देशमुखने म्हटले आहे. याबाबत त्याने ट्विट केले आहे.

नागपुरमध्ये एका कोरोना रुग्णाला रेमडेसिवीर इंजेक्शनऐवजी अॅसिडिटीचे इंजेक्शन देण्यात आले होते. नागपुरातील जामठा परिसरातील कोविडालय नावाच्या रुग्णालयात दिनेश गायकवाड नावाच्या पुरुष नर्सला आयसीयूमध्ये दाखल असलेल्या आणि अत्यवस्थ असलेल्या एका रुग्णाला लावण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने तीन रेमडेसिवीर इंजेक्शन दिले होते. दरम्यान, दिनेश गायकवाड म्हणजेच आरोपी पुरुष नर्सने तीनपैकी दोन रेमडेसिवीर इंजेक्शन आपल्याकडे ठेवले आणि त्याऐवजी अत्यवस्थ रुग्णाला चक्क अॅसिडिटीचे इंजेक्शन टोचले. त्यानंतर रुग्णालयातील रेकॉर्डवर संबंधित रुग्णाला विशिष्ट कालावधीत तीन रेमडेसिवीर इंजेक्शन टोचल्याची नोंद केली. या धक्कादायक घटनेवरून रितेशने संताप व्यक्त केला आहे.

[removed][removed]