मुंबई - कंगना रानौत नेहमीच आपल्या वादग्रस्त टि्वटमुळे चर्चेत असते. परंतु तिला असे वादग्रस्त टि्वट करणे चांगलेच महागात पडले आहे. तिच्या वादग्रस्त टि्वटवरून पोलिसात गुन्हे दाखल झाले आहेत. आता मुंबई पोलिसांनी कंगना आणि तिची बहिण रंगोलीला पुन्हा नोटीस पाठवली आहे. दोघींना १० नोव्हेंबरला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

एएनआयने टि्वट करून कंगना रानौतला पाठवलेल्या नोटीसची माहिती दिली आहे. कंगना आणि रंगोलीला वांद्रे पोलिसांनी पोलिसांनी नोटीस पाठवून १० नोव्हेंबरला पोलिस ठाण्यात हजर राहण्यास सांगितले आहे.

कंगनासह तिची बहीण रंगोली रनौतच्या विरोधात वांद्रे पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे आदेश कोर्टाने दिले होते. कंगनाने मुंबई बद्दल केलेले वादग्रस्त ट्वीट, दोन धर्मात तेढ निर्माण होणारे वक्तव्य, हिंदू आणि मुस्लिम यांच्यात तेढ निर्माण करणारे वक्तव्य केले होते. या वक्तव्याविरोधात कंगना विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती.

दिग्दर्शक साहिल सय्यदने प्रथम मुंबई पोलिसात अर्ज दाखल केला होता. त्याने तक्रारीत म्हटले होते, मागील दोन महिन्यांपासून कंगना आपल्या टि्वट आणि टीव्हीवरील मुलाखतीत बॉलिवूडला भाई-भतीजावादाचा गट आणि भेदभावाचे स्थान असे म्हणून बदनाम करत आहेत. ती प्रत्येक वेळी बॉलिवूडला घराणेशाही आणि कंपूबाजीबद्दल बोलत असते. मात्र, पोलिसांनी अर्जाची दखल न घेतल्याने त्याने कोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर कोर्टाने कंगना आणि तिच्या बहिणी विरोधात 1523 A, 295 A, IPC 124 A या कलमातंर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

मध्यंतरी कंगना रानौतने बॉलिवूड इंडस्ट्रीवर टीका करताना याठिकाणी मुस्लिमांचे प्राबल्य असल्याचे वक्तव्य केले होते. मी झाशीच्या राणीच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवून हे इस्लामी प्राबल्य मोडून काढले, अशी टीका कंगना रानौतने केली होती.