मुंबई : देशभर कोरोना लसीकरण चालू आहे. लोकही वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोना लस घ्यायला जाताना दिसत 

आहेत. मात्र तिथे त्यांना लाईनमध्ये उभे रहाव लागत आहे. रणरणत्या उन्हात नागरिक लस घेण्यासाठी थांबावे लागत 

असल्यामुळे मराठी अभिनेता हेमंत ढोमेने संताप व्यक्त केलाय.

सर्व नियम पाळणारा, सरकारला प्रामाणिकपणे टॅक्स भरणारा, या देशावर प्रचंड प्रेम असणारा माझा सामान्य माणुस आता आरोग्य सुविधांसाठी जगण्यासाठी रांगेत उभा आहे. उन्हा-तान्हाचा कुठल्याही सावलीशिवाय खूप वय असलेला, थकलेला, असे हेमंत ढोमेने म्हटलेय. याबाबत त्याने ट्विट करत काही फोटो पोस्ट केलेत. नेस्को (गोरेगाव, मुंबई) लसीकरण केंद्राबाहेर रांगा लावून उभ्या असलेल्या लोकांचे फोटो त्याने ट्विट केले आहेत.

कमीत कमी 1 किलोमीटर तरी हजारो लोक आहेत गेटवर. चेंगराचेंगरी. सोशल डिस्टन्सिंगचा पत्ता नाही. एवढे करुन लस मिळेल की नाही हेसुद्धा माहित नाही. सारी व्यवस्था कोलमडलीये. माणसाला माणसासारखे तरी वागवा महासत्ता होणार म्हणे, महाथट्टा नक्कीच झाली आहे, अशी टीका हेमंत ढोमेने केली आहे.

https://twitter.com/hemantdhome21/status/1385821931006349313