नवी दिल्ली : भारतात कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींना आपात्कालीन वापराण्याची परवानगी देण्यात आली आहे.  सीरम आणि ऑक्सफोर्डने तयार केलेल्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेक कंपनीने तयार केलेल्या कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींना आपात्कालीन वापरासाठी संमती दिली आहे, अशी माहिती डीसीजीआयने पत्रकार परिषद घेऊन दिली आहे. 
भारतात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला आहे. या पार्श्वभूमिवर चर्चा सुरु झाली ती लसीकरणाच्या मोहिमेची. कालच देशभरात  ड्राय रनही पार पडले आहे. आता प्रतीक्षा होती ती आपात्कालीन वापरासाठी दोन्ही लसींना परवानगी मिळणार का ?नाही. परंतु, आता दोन्ही लसींना आपात्कालीन वापरासाठी संमती मिळाली आहे, अशी घोषणा डीसीजीआयने केली आहे.
डीसीजीआयने म्हंटले आहे की, या दोन्ही व्हॅक्सिन अर्थात लसी पूर्णपणे सुरक्षित आहे. सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांनी यापूर्वीच लसीचे पाच कोटी डोस तयार असल्याचे  स्पष्ट केले आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात अडीच कोटी लोकांना लस दिली जाण्याची शक्यता आहे.