पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीला भरपूर अवधी असताना भाजपाने आतापासूनच पश्चिम बंगालमध्ये आपले पाय बळकट करण्यास सुरूवात केली आहे. बंगालमध्ये आज आणि शनिवारीही भाजपाचा झंझावात दिसून आला.

[removed][removed]


पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आहेत. अमित शाह यांच्या उपस्थितीत शनिवारी तृणमूल काँग्रेस व सीएएममधील ११ आमदारांनी व एका माजी खासदाराने भाजपात प्रवेश केला आहे. या महाभरतीनंतर अमित शाह यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर घणाघाती हल्ला चढवला होता. दरम्यान, आज अमित शाह यांच्या रोड शो ला मोठ्या प्रमाणात लोकांची उपस्थिती दिसून येत आहे. या रोड शोवर अमित शाह यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अमित शाह म्हणाले मी असा रोड शो यापूर्वी कधी पाहिला नाही. लोकांना आता परिवर्तन हवे आहे, असे मत शाह यांनी व्यक्त केले आहे.