(संग्रहित छायाचिञ)
नवी दिल्ली :
पुद्दुचेरीमधील काँग्रेस सरकार सोमवारी विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्यापूर्वीच कोसळल्यानंतर तेथे राष्ट्रपती राजवट लागू करण्यास केंद्रीय मंत्रीमंडळाने मंजुरी दिली आहे. विश्वासदर्शक ठराव मांडण्यासाठी एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले होते. माञ, अल्पमतात असणारे मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांचे सरकार ठरावला सामोरे जाण्याआधीच कोसळले आहे.
काँग्रेस आणि द्रमुकच्या प्रत्येकी एक आमदाराच्या राजीनाम्याने ३३ सदस्य असलेल्या विधानसभेत सत्तारुढ काँग्रेस आघाडीचे संख्याबळ ११ पर्यंत घसरले होते. विरोधी आघाडीकडे १४ सदस्य, तर सात जागा रिक्त आहेत. यामुळे नारायणस्वामी यांच्या सरकारवर बहुमत सिद्ध करण्याची वेळ आली होती. पण विश्वासदर्शक ठरावात बहुमत सिद्द न करता आल्याने काँग्रेसचे सरकार कोसळले आहे.

हा तर राजकीय वेश्याव्यवसाय : नारायणसामी सरकारचा ११ विरुद्ध ११ अशा मतांनी पराभव झाला आहे. बहुमत ठराव सादर करण्यासाठी एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले होते. अधिवेशन सुरु होताच नारायणसामी यांनी बहुमतासाठी प्रस्ताव मांडला होता. पण काही वेळातच त्यांच्यासहित सत्ताधारी आमदारांनी सभात्याग केला. यानंतर अध्यक्षांनी काँग्रेस सरकार अल्पमतात असल्याचं जाहीर केलं. यानंतर मुख्यमंत्री नारायणसामी यांनी राज्यपालांची भेट घेऊन राजीनामा सोपवला आहे.