उत्तर प्रदेश - उत्तर प्रदेशच्या हाथरस येथे सामूहिक बलात्कार झालेल्या 20 वर्षीय मुलीचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. तिच्यावर दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरु होते. तिच्या शरिरावर जमखा आणि ठिकठिकाणी फ्रॅक्चर्स झाल्याने मुलगी उपचारास प्रतिसाद देऊ शकली नाही आणि तिची प्राणज्योत मालावली.
या मुलीवर 14 सप्टेंबरला तिच्या शेतात चार नराधमांनी बलात्कार केला होता. दुसऱ्या दिवशी तिला अलिगढ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तिची प्रकृती खालावत असल्याने तिला दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात हलविण्यात आले. मुलीची प्रकृती गंभीर होती. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 4 नराधमांना अटक केली आहे. त्यांची चौकशी सुरु आहे.
मुलीच्या भावाने सांगितले, '14 सप्टेंबर रोजी माझी आई, बहीण आणि मोठा भाऊ शेतात गेले होते. मोठा भाऊ चारा घेऊन घरी आला. आई आणि बहीण शेतात काम करत होत्या. त्यावेळी चारजण गुपचुप आले, त्यांनी माझ्या बहिणीच्या गळ्यात ओढणी टाकून तिला बाजूच्या शेतात घेऊन गेले. बहीण दिसत नसल्याने आईने तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. पण ती शेजारच्या शेतात बेशुद्ध पडलेली दिसून आली. तिच्यावर अत्याचार झाल्याचे आईला कळाले.'
मान मोडली, जीभ कापली तरी पीडितेने दिला जबाब....
नराधमांनी पीडितेची वाईट अवस्था केली. तिची मान मोडली, जीभ कापली, पाठिचे हाड मोडले तरीदेखील तिने पोलिसांना जबाब दिला. तिची जीभ कापलेली होती, तरीही तिने धाडस दाखवून आपल्यावर झालेल्या अत्याचाराविषयी पोलिसांना सांगितले.19 सप्टेंबरला पीडितेचा जबाब नोंदवण्यासाठी पोलिस आले, तेव्हा ती भितीने बेशुद्ध झाली होती. 22 सप्टेंबरला पुन्हा तिचा जबाब नोंदवण्यासाठी रुग्णालयात आले. तेव्हा तिने इशाऱ्या आणि हावभाव करून घटनेची माहिती दिली. त्याआधारे कलम वाढवून चार आरोपींना बेड्या ठोकल्या.
बसपाच्या अध्यक्षा मायावती यांनी टि्वट करून या घटनेचा निषध व्यक्त केला.

[removed][removed]यूपी के हाथरस में गैंगरेप के बाद दलित पीड़िता की आज हुई मौत की खबर अति-दुःखद। सरकार पीड़ित परिवार की हर संभव सहायता करे व फास्ट ट्रैक कोर्ट में मुकदमा चलाकर अपराधियों को जल्द सजा सुनिश्चित करे, बीएसपी की यह माँग।
— Mayawati (@Mayawati) September 29, 2020