कोलंबो : भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू कृणाल पंड्याला कोरोनाची लागण झाल्यामुळे भारत आणि श्रीलंकेचा होणारा दुसरा टी-20 सामना काल रद्द करण्यात आला होता. कृणाल पंड्याच्या संपर्कात आलेल्या खेळा़डूंची चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर आजचा दुसरा टी-20 सामना खेळवला जाणार आहे. इतर खेळाडूंची चाचणी निगेटिव्ह आल्यामुळे भारत-श्रीलंकेच्या टी-20 मालिकेवरील संकट टळले आहे. 
भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू कृणाल पंड्याला कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे, भारत आणि श्रीलंकेच्या संघावर मोठे संकट उभा राहीले होते. काल याच कारणामुळे टी-20 सामना रद्द करण्यात आला होता. माञ, कृणालच्या संपर्कात आलेल्या खेळा़डूंची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर भारतीय संघाच्या जीवात जीव आला आहे. त्यामुळे आजचा सामना होणार आहे. श्रीलंका दौर्‍यावर वनडे मालिका २-१ने जिंकल्यानंतर शिखर धवनच्या नेतृत्वात टीम इंडियाला टी-२० मालिका जिंकण्याची आज उत्तम संधी आहे. आज मंगळवारी कोलंबोमध्ये दोन्ही संघात दुसरा टी-२० सामना रंगणार आहे. यजमान श्रीलंकेसाठी हा सामना करो किंवा मरो असाच आहे.

दोन्ही संघ

भारतः शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), मनीष पांडे, हार्दिक पंड्या, नितीश राणा, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), यजुर्वेंद्र चहल, राहुल चहर, कृष्णप्पा गौथम, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, दीपक चहर, नवदीप सैनी, चेतन साकारिया.

श्रीलंका: दासुन शनाका (कर्णधार), धनंजय डि सिल्वा, अविष्का फर्नांडो, भानुका राजपक्षा, पथुम निसांका, चरित असालांका, वानिदू हसरंगा, असीन बंडारा, मिनोद भानुका, लाहिरू उदारा, रमेश मेंडिस, चमिका करुणारत्ने, बिनुरा फर्नांडो, दुश्मंथा संदाकन, अकिला धनंजया, शिरन फर्नांडो, धनंजय लक्षण, ईशान जयरत्ने, प्रवीण जयविक्रमा, असिथा फर्नांडो, कसुन रजिता, लाहिरु कुमारा, इसुरु उदाना.