नवी दिल्ली : महाराष्ट्रापाठोपठ दिल्लीतही कोरोनाने धुमाकूळ घालण्यास सुरूवात केली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी दिल्लीत मजबूरीने विकेंड कर्फ्यू  लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. जर परिस्थिती अशीच राहिली, तर लोकांचे जीव वाचवण्यासाठी आणखी कठोर पावले उचलावी लागतील, असं म्हणत मुख्यमंञी अरविंद केजरीवाल यांनी लॉकडाऊनचा इशारा दिला आहे.
अरविंद केजरीवाल म्हणाले की, दिल्लीची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. आम्ही यावर नजर ठेऊन आहे. जर परिस्थिती आणखी बिकट झाली. तर लोकांची जीव वाचवण्यासाठी आणखी कठोर पावले उचलावी लागतील आणि कोरोनाला नियंञणात आणावा लागले, असे मुख्यमंञी केजरीवाल यांनी स्पष्ट केले.
कोरोना चाचणीला तीन-चार दिवस लागत आहे, अशा तक्रारी येत आहे. याचे कारण काही प्रयोगशाळा चाचण्या करण्यासाठी क्षमतेपेक्षा अधिक स्वॅब घेत आहे. ज्या प्रयोगशाळा क्षमतेपेक्षा अधिक स्वॅब घेत आहे. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंञी केजरीवाल यांनी सांगितले आहे.
कोरोना लढाईत आम्हाला नेहमी केंद्र सरकारची मदत मिळाली आहे. आम्ही आशा करतो की, याही वेळी आम्हाला केंद्राकडून पूर्णपणे मदत मिळेल, अशा विश्वासही मुख्यमंञी केजरीवाल यांनी व्यक्त केला आहे.