लखनऊ : पश्चिम बंगालमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि मुख्यमंञी ममता बॅनर्जी यांच्या पायाला नंदीग्राम दौऱ्यादरम्यान मोठी जखम झाली आहे. तृणमूल काँग्रेसने या घटनेनंतर भाजच्या कार्यकर्त्यांनी ममता  बॅनर्जी यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, आता या घटनेवर समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी सुध्दा प्रतिक्रिया दिली आहे. केवळ ममता बॅनर्जी यांच्यावरच नव्हे, तर आमच्यावर, तुमच्यावरही हल्ले होतील, असे म्हणत भाजवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
अखिलेश यादव पुढे बोलताना म्हणाले की, भाजपने ममता बॅनर्जी यांच्या पायावर यासाठी जमख केली आहे की, त्या प्रचार करू शकल्या नाही पाहिजे. भाजपला माहिती आहे की बॅनर्जी यांच्या पायाला जखम झाली, तर त्या प्रचार करणार नाही. केवळ ममता बॅनर्जी यांच्यावरच नव्हे, तर आमच्यावर, तुमच्यावरही हे हल्ले होतील, असे अखिलेश यादव म्हणाले आहे.