नवी दिल्ली : केंद्रीय रिझर्व्ह पोलिस दलाने (सीआरपीएफ) जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर पदासाठी अधिसूचना जारी केलेली आहे. या अधिसूचनेअंतर्गत एकूण 54 पदांवर भरती करण्यात येणार आहे. या पदांच्या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीसाठी 04 मे 2021 रोजी अधिसूचना जारी केली आहे.  सीआरपीएफमध्ये सरकारी नोकरीसाठी ही एक उत्तम संधी आहे. ज्या तरुणांना या पदावर अर्ज करण्याची इच्छा आहे त्यांनी अधिकृत वेबसाइट crpf.gov.in वर जाऊन अर्ज करावा.
या भरती अंतर्गत अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. यात वॉक-इन-इंटरव्ह्यूच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. ही भरती प्रक्रिया जीडीएमओच्या 54 पदे भरण्यासाठी आयोजित केली जात आहे. यासाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत अधिसूचना तपासणे आवश्यक आहे. इच्छुक उमेदवार सीआरपीएफने 13 मे 2021 रोजी आयोजित वॉक-इन-मुलाखतीसाठी अर्ज करू शकतात. 

ही आहे, भरतीचा तपशील : यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना सीआरपीएफच्या जम्मू-काश्मीर विभाग, उत्तर-पूर्व विभाग, मध्य विभाग आणि दक्षिण विभागात ठरलेल्या विविध केंद्रांवर वॉक-इन-इंटरव्ह्यूसाठी उपस्थित रहावे लागेल. उमेदवारांना त्यांचे अर्ज (बायोडेटा), 5 पासपोर्ट आकाराचे फोटो, सर्व कागदपत्रांची मूळ प्रत आणि प्रत्येकाची एक-एक फोटोकॉपी सोबत आणावी लागेल. उमेदवारांनी नोंद घ्यावी की वॉक-इन-मुलाखतीसाठी कोणतेही टीए-डीए सीआरपीएफकडून दिले जाणार नाहीत. जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर (जीडीएमओ) या पदावर पोस्ट केलेल्या उमेदवारांना दरमहा 75,000 रुपये पगार देण्यात येईल.

पात्रता आणि वय मर्यादा : जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर पदावर भरतीसाठी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे मान्यताप्राप्त संस्थेची एमबीबीएसची पदवी असावी आणि एमसीआयने ठरविलेल्या कालावधीची इंटर्नशिप पूर्ण केलेली असावी. तसेच मुलाखतीच्या तारखेनुसार उमेदवाराचे वय 70 वर्षांपेक्षा जास्त नसावे.