पालघर : रेल्वेमध्ये कामाला असताना लग्नाचे आमिष दाखवून तरूणीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. लग्नाची भुलथाप मारून लैंगिक अत्याचार करणाऱ्या या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. वसई रोड लोहमार्ग पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे. शेष प्रसाद उर्फ दिपू हिरालाल पांड्ये असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून तो मूळचा मध्येप्रदेश येथील रहिवाशी असल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार लग्नाचे आमिष दाखवून 21 वर्षीय तरुणीचे लैंगिक शोषण केल्याची तक्रार 26 जुलै 2021 रोजी वसई लोहमार्ग पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. बलात्कार करुन आरोपी फरार झाला होता. पोलीस आरोपीचा शोध घेत होते. पोलिसांनी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळवून आरोपीच्या मोबाईल फोनचे लोक्शन ट्रेस केले होते. त्याच्या लोकेशननुसार तो तेलंगाणा येथील हैद्राबाद येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी सापळा रचून आरोपी प्रसाद याला तेलंगाणा हैद्राबाद येतून अटक केली आहे.