उत्तर प्रदेश - आज काँग्रेस खासदार राहूल गांधी आणि काँग्रेसच्या महासचिव प्रियंका उत्तर प्रदेशातील हाथरस सामूहिक बलात्कार पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी जात असताना नोएडा पोलिसांनी त्यांची कार अडवली. अखेर ते पीडितेच्या घरापर्यंत म्हणजे 140 किलोमीटर पायी चालत गेले. यावेळी धक्काबुक्की दरम्यान राहूल गांधी जमिनीवर पडले.

राहूल गांधी यांना अटक करण्यात आली आहे. हाथरस सामूहिक बलात्कार पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी जात असताना पोलिसांनी ही कारवाई केली, असे वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे. कलम 188 अंतर्गत ही कारवाई करण्यात आली.

राहूल गांधी पोलिसांना विचारले की मला कुठल्या कलमांअंतर्गत अटक करत आहे. जनतेला आणि माध्यमांना सांगा. यावर पोलिस म्हणाले, तुम्हाला ते सर्व सांगितल्या जाईल, तुम्ही कलम 188 चे उल्लंघन केले आहे.

यावर राहूल यांनी 'पोलिसांनी मला धक्का दिली, लाठीचार्ज केला, मला जमिनीवर पाडले. या देशात फक्त मोदीच पायी चालू शकतात का, सामान्य माणूस चालू शकत नाही का? आमच्या गाड्या अडवल्याने आम्ही पायी चालायला सुरुवात केली. मला पीडितेच्या कुटुंबियांना भेटायचे आहे, हे मला थांबवू शकत नाहीत.' असा सवाल केला.

(हाथरसला पायी जाताना राहूल गांधी यांच्यासोबत पोलिसांनी धक्काबुक्की केली. यादरम्यान ते जमिनीवर कोसळले.)

                       

(हाथरसमध्ये पोहोचलेले राहूल गांधी यांच्यासोबत पोलिसांनी धक्काबुक्की केली)

उत्तर प्रदेश सरकारने हाथरसमध्ये 31 ऑ क्टोबरपर्यंत 144 कलम लागू करण्यात आली आहे. हाथरसच्या सर्व सीमा सील करण्यात आल्या आहेत. पीडितेच्या गावात बॅरिकेड लावले आहेत.

                                                    (हाथरसमध्ये पोहोचलेले राहूल गांधी)   

पीडितेच्या कुटुंबियांचा धमक्या देऊन आवाज दाबतंय सरकार?
प्रियंका गांधी टि्वट करुन म्हणाल्या, 'पीडितेच्या वडिलांना जबरदस्ती घेवून जाण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या नावाखाली केवळ दबाव टाकण्यात येत आहे. पीडितेचे कुटुंबिय या प्रकरणी होत असलेल्या तपासामुळे समाधानी नाहीये. आता सर्व कुटुंबाला नरजकैदेत ठेवले आहे. त्यांना बोलण्यासही मनाई केली आहे. त्यांचा आवाज दाबून त्यांना गप्प करतंय का हे सरकार?'