टोकियो :  भारताची तडाखेबाज बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने आपला आक्रमक फॉम कायम राखत टोकियो ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरी गाठली आहे. पी. व्ही. सिंधूने उपांत्यपूर्व फेरीत जपानच्या अकाने यामागुचीवर सहज सरशी साधली. सिंधूच्या नव्या शैलीसमो यामागुची निष्प्रभ ठरली. तिने यामागुचीचा २१-१२, २२-२० असे सरळ सेटमध्ये नमवले आहे.

सिंधू दोन पाऊल दूर : सिंधू आता सुवर्णपदकापासून फक्त दोन पाऊल दूर राहीलेली आहे. उपांत्यफेरीच्या लढतीत सिंधूसमोर ताई जू यिंग किंवा रत्नाचोक इंतानोन यापैकी एकजण आमनेसामने असणार आहे. या स्पर्धेचा चौथा उपांत्यपूर्व सामना तैवानच्या ताई जू आणि थायलंडच्या इंतानोन यांच्यात होणार आहे. हा सामना जिंकणारी खेळाडूच पी. व्ही. सिंधूला टक्कर देईल. महिला एकेरीच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत दोन चीनी खेळाडू चेन युफेई आणि ही बिंगझाओ यांच्यात सामना होईल. ही बिंगजाओने जपानच्या नोझोमी ओकुहाराला पराभूत करून उपांत्य फेरी गाठली. चेन युफेईने कोरियाच्या एन से यंगचा पराभव केला.

[removed][removed]