नवी दिल्ली : केंद्राच्या नव्या तीन कृषी कायद्या विरोधात लाखोच्या संख्येने शेतकरी दिल्लीच्या वेशीवर मागील दोन महिन्यापासून आंदोलन करत आहे. हे शेतकरी दिल्लीमध्ये शिरु नयेत म्हणून दिल्लीच्या वेशीवर म्हणजेच सिंघू, टिकरी आणि गाझीपूर या सीमेच्या परिसरात चार ते पाच फूट उंचीच्या सुरक्षा भिंती दिल्ली पोलिसांनी उभारल्या आहेत. राष्ट्रीय महामार्गांवर काँक्रीटचं बांधकाम करत या भिंती उभारल्या असून लोखंडी टोकदार सुळ लावले आहे. दिल्ली पोलिसांनी संयुक्त किसान मोर्चामधील आंदोलक दिल्लीमध्ये घुसू नये म्हणून ही नाकाबंदी केली आहे. या भिंतीच्या पलीकडेही दीड किलोमीटरपर्यंत वेगवेगळे अडथळे उभारत बॅरिकेट्, खिळे, लोखंडी खांब, तारा टाकून शेतकऱ्यांची प्रवेशबंदी  करण्यात आली आहे.  माञ, दिल्ली पोलिसांच्या या आठमुठ्या भूमिकेमुळे  शेतकऱ्यांना दिल्ली सरकारने उपलब्ध करुन दिलेल्या शौचालय व्हॅन आणि पाण्याच्या टँकर्सपर्यंत पोहचता येत नाहीये. त्यामुळेच दिल्ली पोलिसांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे लाखो शेतकऱ्यांना दिल्लीच्या सीमेवर पाणी आणि शौचालयांसारख्या मूलभूत गरजांपासून वंचित रहावे लागत आहे. सरकार शेतकऱ्यांचा दिल्लीच्या वेशीवर अशा प्रकारे छळ करत असल्यामुळे देशभरातून नाराजी व्यक्त होत आहे.  

पाण्यासाठी बोरवेल खोदू, माञ मागे हटणार नाही : दिल्ली पोलिसांनी चार ते पाच फूट भिंती उभारल्याने शेतकऱ्यांना मोठा ञास सहन करावा लागत आहे. माञ, आम्हाला कितीही ञास सहन करावा लागला तरू आम्ही करू, पण आम्ही मागे हटणार नाही, असा कडक पाविञा शेतकऱ्यांनी घेतली आहे. "आम्ही शेतकरी आहोत. गरज पडली तर आम्ही पाण्यासाठी येथेच बोरवेल खोदू. पाण्याचा पुरवठा बंद केल्याने आम्ही मागे हटू असा विचार सरकारने करु नये. आम्ही आमच्या मुलांच्या भविष्यासंदर्भातील सकारात्मक निर्णय घेतला जात नाही, तोपर्यंत आम्ही गावाकडे परत जाणार नाही," असे पटीयाला येथून आंदोलनासाठी आलेल्या कुलजीत सिंग या शेतकऱ्याने  एका वृत्तपञाशी बोलताना सांगितले आहे.

महिलांना होतोय ञास : दिल्ली पोलिसांनी घेतलेल्या या आठमुठ भूमिकेमुळे दिल्ली-चंढीगड सीमेवर शेतकऱ्यांचा शौचालयांचा प्रश्न निर्माण झाला आहे. चंढीगडच्या बाजूनेही काही शौचालये उभारण्यात आली आहेत. माञ, शौचालयांची संख्या आणि शेतकऱ्यांची संख्या यामुळे शौचालय वापरण्यासाठी शेतकऱ्यांना बराच वेळ वाट पहावी लागत आहे. याच कारणामुळे अनेक शेतकरी आता उघड्यावर शौचाला जात आहे. महिला आंदोलकांची संख्याही जास्त असल्याने उभारण्यात आलेली शौचायले त्यांना वापरलाय देण्यास प्राधान्य दिले जात आहे. हरयाणा दिल्ली सीमेजवळ हरयाणाच्या बाजूला कचऱ्याचा साठा वाढू लागला आहे. शेतकऱ्यांच्या जेवणाची सोय करण्यात आलेल्या लंगरमध्ये वापरण्यात आलेली ताट, वाट्या आणि इतर एकदाच वापरुन फेकून देण्यात येणारा कचरा येथील रिकाम्या जागी नेऊन जाळून नष्ट केला जात आहे. 

प्रसारमाध्यमांनाही बंदी : दिल्लीच्या वेशीवर ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात नाकाबंदी केली आहे. त्यावरुन दिल्ली पोलिसांनी शेतकऱ्यांना दिल्लीत प्रवेश देण्यात येणार नसल्याचे सांगितले आहे.  दिल्ली हरयाणा सीमेवर काँक्रीटच्या भिंती उभारण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर तारा पसरवूनही नाकाबंदी करण्यात आली आहे. या भिंतीच्या मागे दिल्लीच्या बाजूने दूरदूरपर्यंत म्हणजेच अगदी सिंघोला गावातपर्यंत बॅरीकेट्स लावण्यात आलेत. या नाकाबंदीच्या दरम्यान पुढे प्रसारमाध्यमांना जाता येणार नाही, असे दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केले आहे. 

पोलिसांकडून समर्थन : सुरक्षा भिंत, तारांचे कुंपण उभारण्याच्या निर्णयाचे दिल्लीचे पोलीस आयुक्त एस. एन. श्रीवास्तव यांनी समर्थन केले आहे. २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी अडथळे तोडून दिल्लीत प्रवेश केला होता. सुरक्षेसाठी पोलिसांनी हेच अडथळे आता अधिक भक्कम करण्यात आले आहे, असे श्रीवास्तव म्हणाले.