नवी दिल्ली :  मानवी हक्क या गोष्टीकडे केवळ राजकीय फायदा म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळे मानवी हक्कांचे तसेच देशाच्या लोकशाहीचे मोठे नुसान होत आहे. मानवी हक्कांच्या नावाखाली देशाच्या प्रतिमेला मलिन करण्याचे काम काही लोक करत आहे, अशी चिंता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. अशा गोष्टी वेळीच ओळखून त्याबद्दल आपण सावध पाहिले पाहिजे असे देकील मोदी म्हणाले.
राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या 28 व्या स्थापना दिनानिमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, मानवी हक्कांचा विषय येतो. त्यावेळी काही लोक ठरावीक घटनांवर, ठरावीक घटकांच्या हक्कांच्या उल्लंघनावर मोठी चर्चा करत असतात. पण त्याच पद्धतीच्या घटना इतर ठिकाणी होतात, त्यावर हे लोक गप्प राहणे पसंत करतात. त्यामुळे ठराविक घटनांवर आवाज उठवून देशाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप देखील मोदी यांनी विरोधकांवर केला आहे.
मोदी पुढे म्हणाले की, काही लोकांकडून मानवी हक्कांच्या घटनांकडे राजकीय फायद्याच्या दृष्टीकोनातून पाहिले जात आहे आणि त्याचा वापर राजकारणासाठी केला जातोय. त्यामुळे मानवी हक्कांचे नुकसान होत आहे. पण त्या सोबत देशातील लोकशाहीचे मोठे नुकसान होत आहे. या लोकांच्या वृत्तीमुळे मानवी हक्कांच्या संकल्पनेचे देकील नुकसान होत आहे, असे मोदी म्हणाले आहे.