नवी दिल्ली : वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सर्वच परीक्षा रद्द करण्यात येत आहे. आता केंद्र सरकारने आणखी एक परीक्षा रद्द केली आहे. नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशनकडून घेतली जाणारी नीट पीजी परीक्षा देखील लांबणीवर टाकण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी टि्वटकरून दिली आहे. 
केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी टि्वकरून परीक्षा रद्द करण्याची माहिती दिली आहे. टि्वटवर मंञी पोखरियाल यांनी एक परिपञक शेअर केले आहे. या परीक्षा कोरोना आटोक्यात आल्यानंतरच घेण्यात येईल, असे यात म्हटले आहे.  तसेच, विद्यार्थ्यांना 15 दिवस अभ्यासाला वेळ मिळेल अशा पद्धतीने नवी तारीख जाहीर करण्यात येईल, असे मंञी पोखरियाल यांनी स्पष्ट केले आहे.

[removed][removed]