मुंबई : उत्तर प्रदेशातील हाथसर येथील तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली. त्यामुळे, देशातील नागरिकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे. या पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी रवाना झालेल्या काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी धक्काबुक्की करत अटक केली. या प्रकारावर शरद पवार यांनी ट्विटकरत प्रचंड रोष व्यक्त केला.

[removed][removed]


शरद पवार ट्वीटमध्ये लिहितात की, उत्तर प्रदेश पोलिसांनी राहुल गांधींसोबत केलेले वर्तन हे अत्यंत निंदनीय आहे. अशा पद्धतीने लोकशाही मूल्ये पायदळी तुडवली जात आहेत. कायदा हातात घेतला जातोय, पवार यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हंटले आहे.