मोदी सरकारने आणलेले कृषी कायदे शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारे कायदे आहेत. मोदी सरकारचे धोरण शेतकरी आणि कामगार यांनी उद्ध्वस्त करणारे आहे, अशी टिका काँग्रेस खासदार राहूल गांधी यांनी मोदी सरकारवर केली. पंजाबच्या संगरुरया ठिकाणी झालेल्या रॅलीत राहूल बोलत होते.
राहूल गांधी यावेळी बोलताना म्हणाले की, सध्याच्या घडीला आणण्यात आलेले कृषी कायदे हे शेतकरी आणि कामगारांना उद्ध्वस्त करणारे कायदे आहेत. तर जीएसटी आणि नोटाबंदीमुळे लघू आणि मध्यम व्यापाऱ्यांचे आर्थिकदृष्ट्या कंबरडे मोडले आहे, अशी टिकाही राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर केली.
मागील सहा वर्षांमध्ये शेतकरी, गरीब जनता, मजूर वर्ग यांच्यावर मोदी सरकारकडून एकापाठोपाठ एक आक्रमणे केली जात आहेत. गरीब जनतेसाठी ठोस पावले उचलावती ही यांची निती नाही. मोदींना फक्त त्यांच्या तीन ते चार मित्रांचं भलं करायचं आहे. पंजाबच्या संगरुरया ठिकाणी झालेल्या रॅलीत त्यांनी हे वक्तव्य केले.
आताचे सरकार हे कळसुत्रीच्या बाहुल्यांप्रमाणे काही मूठभर लोकांच्या तालावर नाचत आहे. पंजाब-हरयाणातील शेतकऱ्यांनी भारताला खाद्य सुरक्षा दिली. आमच्या सरकारने कृषी उत्पन्न बाजार समिती, पीक खरेदी आणि बाजाराची रचना तयार केली होती. मोदी सरकार ती संपवू पाहत आहे मात्र, काँग्रेस हे होऊ देणार नाही असंही त्यांनी म्हटले आहे.