नवी दिल्ली : क्रूझवरील अमलीपदार्थ पार्टीप्रकरणी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आली असून तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. जामीन मिळावा यासाठी आर्यन खानच्या वकीलाचे प्रयत्न सुरू आहे. दरम्यान आर्यन खानच्या अटकेला धार्मिक रंग  मिळत आहे. पिपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांनी आर्यन खान अटकेवरुन केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. 
मेहबुबा मुफ्ती यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, चार शेतकऱ्यांच्या हत्येचा आरोपी असलेल्या केंद्रीय मंत्र्याच्या मुलावर कारवाई करुन उदाहरण देण्याऐवजी केंद्रीय यंत्रणा फक्त आडनाव खान असल्याने २३ वर्षाच्या मुलाच्या मागे लागली आहे. भाजपाच्या मतदारांना खूश करत त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुस्लिमांना टार्गेट करण्यात येत आहे. ही न्यायाची विटंबना आहे, असे मेहबुबा मुफ्ती यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.

[removed][removed]