(संग्रहित छायाचिञ)
लंडन :
फ्रांसमध्ये कोरोनाची तिसरी लाट पसरत आहे. यामुळे फ्रांसच्या राजधानी पॅरिसमध्ये एका महिन्याचा लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पॅरिससह इतर १६ शहरांमध्ये शुक्रवारी रात्रीपासून एक महिन्याचा लॉकडाऊन असेल. फ्रांसचे पंतप्रधान जीन कॅस्टेक्स यांनी सांगितले की, हा लॉकडाऊन आधिप्रमाणे कडक नसेल. फ्रांसमध्ये मागील २४ तासात ३५ हजार नवीन कोरोना संक्रमित रुग्ण आढळले आहे.
तिकडे, यूरोपियन मेडिसिन एजेंसी (EMA)च्या क्लीनचिटनंतर यूरोपियन देश लवकरच एस्ट्राजेनेका-ऑक्सफोर्डच्या कोरोना लसीचा वापर पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. यूरोपियन देशांनी म्हटले की, स्पेन, पुर्तगाल, नीदरलंड, जर्मनी, इटली, फ्रांस, लात्विया, लिथुआनिया आणि साइप्रससह अनेक देशात लवरच या लसीचा वापर सुरू केला जाणार आहे. तर, आयरलंड आणि स्वीडनमध्ये परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर यावर निर्णय घेतला जाईल.

फ्रांसमध्ये तिसरी लाट ? : फ्रांसमध्ये कोरोनाचा संसर्ग प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अनेक नवीन-नवीन व्हेरिएंटसह फ्रांसमध्ये महामारीची तिसरी लाट पसरत आहे.  देशतील १६  राज्यांमध्ये कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी लॉकडाऊनच्या काळातही आवश्यक वस्तुंची विक्री सुरू ठेवली जाणार आहे. याशिवाय, नर्सरी, एलिमेंट्री आणि हायस्कूलदेखील सुरू राहतील. या लॉकडाऊनच्या काळात लोक घराबाहेर पडू शकतील. पण, त्या सर्वांना कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे फ्रांस सरकारने सांगितले आहे.