नवी दिल्ली: आयपीएल २०२० चे साखळी फेरीतील सामने अंतिम टप्प्यात आले असताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने आयपीएलच्या प्ले ऑफ आणि अंतिम सामन्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्याच बरोबर बीसीसीआयने महिला टी-२० चॅलेंज अर्थात महिला आयपीएलचे वेळापत्रक जाहीर केले.

[removed][removed]

आयपीएल २०२० चा थरार सध्या युएईमध्ये सुरू आहे. आयपीएल २०२० आता अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत आहे. माञ, प्ले ऑफ अर्थात गुणतक्त्यातील पहिले चार संघ कोणते असणार हे अद्याप निश्चित झालेले नाही. साखळी फेरीतील सामने अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत असताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने आयपीएलच्या प्ले ऑफ आणि अंतिम सामन्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

पहिला क्वालिफायर ५ नोव्हेंबरला : बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार पहिला क्वालिफायर सामना ५ नोव्हेंबर रोजी दुबईत येथे रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार साडे सात वाजता ही लढत सुरू होईल. गुणतक्त्यात पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर असलेल्या संघात हा सामना होणार आहे. या सामन्यातील विजय संघ थेट फायनलमध्ये जाईल, असे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.

एलिमेनेटरची लढत ६ नोव्हेंबर :आयपीएलमधील एलिमेनेटरची लढत ६ नोव्हेंबर रोजी अबुधाबी मैदानावर साडे सात वाजता सुरू होईल. ही लढत गुणतक्त्यातील तिसरा आणि चौथा संघ यांच्यात असेल. ही लढत जिंकणारा संघ दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात खेळू शकेल. तर पराभव होणारा संघ स्पर्धेबाहेर होणार आहे.

दुसरी क्वालिफायर ८ नोव्हेंबरली : आयपीएलची क्वालिफायरमधील दुसरी लढत ८ नोव्हेंबर रोजी अबुधाबी मैदानावर साडे सात वाजता सुरू होईल. यातील विजेता फायनलसाठी पात्र होणार आहे.

आयपीएलची फायनल १० नोव्हेंबरला : आयपीएल २०२०ची फायनल दुबई आंतरराष्ट्रीय मैदानावर १० नोव्हेंबर रोजी भारतीय वेळेनुसार साडे सात वाजता सुरू होईल.