आबुधाबी: इंडियन प्रीमियर लीगचा(आयपीएल) मंगळवारी मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स संघात सामना झाला. या सामन्यात मुंबईचा 57 धावांनी रॉयल विजय झाला. मुंबईच्या सूर्यकुमार यादवने ४७ चेंडूंत ११ चौकार आणि दोन षटाकांच्या जोरावर नाबाद ७९ धावांची धडाकेबाज खेळी साकारली. राजस्थानकडून जोस बटलरने एकाकी झुंज देत ४४ चेंडूंत ४ चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर ७० धावा केल्या. माञ, त्याला राजस्थानला विजय मिळवून देता आला नाही.


मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा आणि क्विंटन डीकॉक यांनी संघाला ४९ धावांची सलामी मिळवून दिली. माञ, राजस्थानकडून पदार्पण करणाऱ्या कार्तिक त्यागीने यावेळी आपल्या पहिल्याच षटकात डीकॉकला बाद केले.डीकॉकने यावेळी १५ चेंडूंत २३ धावा केल्या. डीकॉक बाद झाल्यानंतर रोहित आणि सूर्यकुमार यादव यांची जोडी चांगली रंगली. रोहित यावेळी अर्धशतक झळकावत विक्रम रचेल, असे वाटत होते. पण श्रेयस गोपाळने रोहितला बाद करत मुंबईला मोठा जोरदार झटका दिला. रोहितने २३ चेंडूंत ३५ धावा केल्या. रोहित पाठोपाठ मुंबईचा इशान किशनही बाद झाला. मुंबईला सलग दोन धक्के बसल्याने मुंबई अडचणीत सापडली. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या कृणाल पंड्यालाही चांगली खेळी साकारता आली नाही. कृणालला १२ धावा करता आल्या.त्यानंतर मुंबईचा धडाकेबाज खेळाडू हार्दिक मैदानावर आला. मुंबईच्या सुर्याने आणि हार्दिकने राजस्थानच्या गोलंदाजाना चांगलाच चोप देत राजस्थानपुढे विजयासाठी १९४ धावांचे आव्हान ठेवले . माञ, हे आव्हान राजस्थानला पेलवेल नाही.मुंबईच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानला सुरुवातीलाच तीन धक्के बसले. यामध्ये यशस्वी जैस्वाल, स्टीव्हन स्मिथ आणि संजू सॅमसन यांचा समावेश होता.

या तीन धक्क्यानंतर राजस्थानची ३ बाद १२ अशी दयनीय अवस्था झाली असताना राजस्थानकडून जोस बटलरने एकाकी झुंज देत ४४ चेंडूंत ४ चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर ७० धावा केल्या. माञ, त्याला राजस्थानला विजय मिळवून देता आला नाही. ट्रेंट बोल्ट आणि जसप्रीत बुमरा यांनी आपल्या पहिल्या स्पेलमध्ये राजस्थानला तीन धक्के देत मुंबईचा विजयाचा मार्ग मोकळा करून दिला.