अबू धाबी : आयपीएलच्या १३व्या हंगामात आज क्वालिफायर २ मध्ये दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद याच्यांत सामना रंगणार आहे. या सामन्यात जो विजय मिळवेल त्याला फायनलचे तिकीट मिळणार आहे. या तिकीटासाठी दिल्ली आणि हैदराबाद आज सायंकाळी 7.30 वाजता आमने-सामने भिडणार आहे.
सनरायजर्स हैदराबादसाठी गेल्या चार लढती या करो वा मरो अशा होत्या. या चारही लढतीत त्यांनी शानदार कामगिरी केली आणि विजय मिळवला. या उटल दिल्लीने स्पर्धेच्या सुरुवातीला धडाकेबाज कामगिरी केली होती नंतर मात्र त्यांच्या कामगिरीत घसरण झाली. क्वालिफायल १ च्या लढतीत मुंबई इंडियन्सने त्यांचा पराभव केला होता. पण गुणतक्त्यात दुसऱ्या स्थानावर असल्याने त्यांना फायनलमध्ये जाण्याची दुसरी संधी मिळत आहे.


आमनेसामने सामने १७                        हैदराबाद               दिल्ली

विजय                                               ११                         ७

सर्वोच्च धावसंख्या                               २१९                     १८९

नीचांकी धावसंख्या                             ११६                      ८०


यंदाच्या हंगामातील सामने : 

२९ सप्टेंबर : हैदराबाद १५ धावांनी विजयी

२७ ऑक्टोबर : हैदराबाद ८८ धावांनी विजयी


सामन्याची वेळ : सायं. ७.३० वा.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १ आणि एचडी वाहिन्या