दुबई : आयपीएलच्या १३व्या हंगामाला चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सला हरवूनच धडाकेबाज प्रारंभ केला होता. परंतु त्यानंतर चेन्नईची कामगिरी निराशाजनक ठरली आहे. आज परतीच्या लढतीत शुक्रवारी मुंबई विरुद्ध चेन्नई सामना रंगणार आहे.
यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जला चांगली कामगिरी करता आलेली नाही. माञ, साखळीतील उर्वरित चारही सामने जिंकून गुणांची बेरीज १४ करीत बाद फेरीसाठी चेन्नईला आशावादी राहता येईल. फॅफ डय़ू प्लेसिस वगळता चेन्नईच्या फलंदाजांमध्ये सातत्याचा अभाव आढळत आहे. धोनी धावांसाठी झगडताना दिसतो आहे. केदार जाधव विश्वास सार्थ करण्यात अपयशी ठरतो आहे.

मुंबईने नऊ सामन्यांपैकी सहा विजय मिळवून आपल्या खात्यावर १२ गुण जमा केले आहे. रविवारी किंग्ज इलेव्हन पंजाबने सुपर ओव्हरच्या महालढतीत हरवण्यापूर्वी मुंबईने सलग पाच सामने जिंकले होते. मुंबईकडे क्विंटन डीकॉक, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांच्यासारखे धडाके बाज फलंदाज आहेत. याशिवाय हाणामारीच्या षटकांमध्ये फटकेबाजी करू शकणारे किरॉन पोलार्ड आणि हार्दिक पंडय़ासुद्धा आहेत. कठीण प्रसंगी कृणाल पंडय़ा आणि राहुल चहर उपयुक्त ठरतात.