(संग्रहित छायाचिञ)
नवी दिल्ली :
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य राहणेने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावेळी भारतीय संघाच्या कर्णधार पदाची जबाबदारी सांभाळली. भारतीय संघाचे दमदार नेतृत्व करत अजिंक्य राहणेने भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाच्या 'गाबा'च्या  मैदानावर ऐतिहासीक विजय मिळवून देत बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका २-१ जिंकली.अजिंक्य राहणेच्या या विजयी नेतृत्वामुळे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली भारावून गेला आहे. विराट म्हणाला, अजिंक्य राहणेने ऑस्ट्रेलियामध्ये ज्या प्रकारे भारतीय संघाचे नेतृत्व केले, ते पाहून मला चांगले वाटले. तसेच, मला आणि राहणेला एकमेंकासोबत फलंदाजी करायला आवडते, असे विराटने सांगितले आहे.
विराट पुढे म्हणाला की, फक्त माझ्यात आणि राहणेंमध्येच नाही, तर संपूर्ण संघात एक विश्वासाचे नाते आहे. आम्ही सगळे जण संघाला विजय मिळवून देण्यासाठी खेळतो, असे विराटने स्पष्ट केले आहे.