मेलबर्न : भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी यूएईहून ऑस्ट्रेलियाला रवाना झाला आहे.ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्टीव स्मिथने भारतीय गोलंदाजांना थेट आव्हन करत म्हणाला आहे की, शॉर्टपीच बॉलची भिती नाही. माझ्याविरोधात जर शॉर्टपीच बॉल टाकण्याचा प्लॅन करत असताल तर मला त्याची काहीही भीती नसल्याचे स्मिथ म्हणाला आहे.
स्मिथ पुढे म्हणाला आहे की, मी माझ्या जीवनात मी खुप साऱ्या शॉर्टपीच बॉलचा सामना केला आहे. त्यामुळे, मला आता शॉर्टपीच बॉलची चिंता वाटत नाही. भारतीय बॅालर्स जर माझ्याविरोधात शॉर्टपीच बॉल टाकून मला आऊट करण्याचा प्रयत्न करणार असतील तर त्याचा काहीही फायदा होणार नाही. उलट भारतीय संघाला त्याचा तोटाच होईल, असे स्मिथ म्हणाला.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यांत गोलंदाजांमध्ये बुमराह आणि मोहम्मद शमी यांच्यावर भारताची जबाबदारी असणार आहे. बुमराह आणि शमीने याअगोदरही स्टीव्ह स्मिथला बऱ्याचदा आऊट केले आहे. कसोटी मालिकेत बुमराह-शमी-स्मिथ यांच्यात कसा सामना रंगतो, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
ऑस्ट्रेलिया टेस्ट टीम : टीम पेन (कर्णधार), पॅट कमिन्स (उप कर्णधार), सीन एबोट, जो बर्न्स, कॅमरन ग्रीन, जोश हेझलवुड, ट्रेविस हेड, मार्नस लाबुशेन, नॅथन लियोन, मायकल नासिर, जेम्स पॅटिन्सन, विल पुकोवस्की, स्टीव स्मिथ, मिचेल स्टार्क, मिचेल स्वेपसन, मॅथ्यू वेड आणि डेव्हिड वार्नर .
भारतीय कसोटी संघ : विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, शुभमन गिल, ऋद्धीमान साहा (विकेटकीपर), ऋषभ पंत (विकेटकीपर), जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन आणि मोहम्मद सिराज
कसोटी मालिकेचे वेळापत्रक
1)पहिली टेस्ट – 17 ते 21 डिसेंबर – अॅडलेड
2)दुसरी टेस्ट – 26 ते 31 डिसेंबर – मेलबर्न किंवा अॅडलेड
3)तिसरी टेस्ट – 7 ते 11 जानेवारी – सिडनी
4)चौथी टेस्ट – 15 ते 19 जानेवारी – ब्रिस्बेन