(संग्रहीत छायाचीञ)

जम्मू-काश्मीर भागात दहशतवादी हल्ले सुरूच आहेत. आज जम्मू-काश्मीरमधील शोपिया जिल्ह्यांतील चकुरा परिसरात जवान व दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत भारतीय जवानांनी आतापर्यंत दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. तसेच, या परिसरात जवानांची शोधमोही सुरू आहे.
जम्मू-काश्मीर खोऱ्यात दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. गेल्या आठवड्यात पाच दिवसांत जवानांनी राबवलेल्या चार मोहिमांमध्ये १० दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती समोर आली होती. तर, एका दहशतवाद्याने आत्मसमर्पण देखील केले होते. शिवाय, दोन दिवसांपूर्वी जवानांकडून लष्कर ए तोयबाचा कमांडर सैफुल्ला याचा देखील खात्मा केला गेला आहे.