नवी दिल्ली : कोरोनाचा प्रदुर्भाव पुन्हा वेग घेताना दिसत आहे. त्यामुळे, आंतरराष्ट्रीय विमानसेवा 31 डिसेंबर 2020 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने  घेतला आहे. यापूर्वी आंतरराष्ट्रीय विमानसेवा 30 नोव्हेंबरपर्यंत बंद राहणार असे जाहीर करण्यात आले होते. माढ, कोरोनाचा वाढता प्रसार लक्षात घेता आंतरराष्ट्रीय विमानसेवा 31 डिसेंबर 2020 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय जाहिर करण्यात आला आहे.

आंतरराष्ट्रीय विमानसेवा 31 डिसेंबर 2020 पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने परिपत्रक जारी करुन दिले आहे. मात्र, या कालावधीत ‘वंदे भारत मिशन’अंतर्गत सुरू असलेल्या खास विमानांना उड्डाणाची परवानगी आहे, असे या परिपञकात स्पष्ट करण्यात आले आहे.