लखनऊ : योगी सरकारच्या शिफारशीनंतर सीबीआईने हाथरस प्रकरण हाती घेतले आहे. उद्या सोमवारी 12 अक्टोबर रोजी इलाहाबाद हायकोर्टाच्या लखनऊ खंडपीठामध्ये या केसची सुनावणी होणार आहे. इलाहाबाद हायकोर्टाने स्वतः नोटीस घेऊन केसमध्ये यूपीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह हाथरसचे डीएम आणि एसपींना बोलावले आहे. हायकोर्टाने पीडित कुटुंबालाही बोलावले आहे. पीडित कुटुंब साक्ष देण्यासाठी आज कडेकोट बंदोबस्तात हाथरसमधून लखनऊत जाणार आहे.

पीडित कुटुंब लखनऊला होणार रवाना :  हाथरस जिल्हा प्रशासन पीडित कुटुंबाला बुलगढी गावातून लखनऊला जाण्यसाठी रवाना होणार आहे. हायकोर्टात सरकारकडून विनोद शाही बाजू मांडतील. कुटुंबाचे प्रत्येक सदस्य आणि साक्षीदारांच्या सुरक्षेसाठी 2-2 सुरक्षारक्षक तैनात केले गेले आहेत. कुटुंबाच्या महिला सदस्यांच्या सुरक्षेसाठी महिला सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत. कुंटुंबाची भेट आज मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत केली जाणार असल्याची चर्चा आहे.

लखनऊ यूनिटची गाजियाबाद टीम करणार तपास :  प्रकरणाचा तपास सीबीआय लखनऊ यूनिटची गाजियाबादची टीम करणार आहे. पोलिसांकडून सीबीआयने दस्तावेज मागितले आहेत. आतापर्यंतचे जबाबद आणि साक्षीदारांची माहिती घेतल्यानंतर सीबीआय एफआयआर दर्ज करुन तपास करेल. यापूर्वी 3 अक्टोबरला मुख्यमंत्र्याच्या निर्देशावर अपर मुख्य सचिव गृह अवनीश अवस्थी आणि डीजीपी हितेश चंद्र अवस्थीने हाथरसमध्ये पोहोचून पीडित कुटुंबाची भेट घेतली होती.