नवी दिल्ली : भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे वृत्त आहे. छातीत दुखू लागल्यामुळे कपिल देव यांना दिल्लीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हृदयात ब्लॉकेज असल्यामुळे त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, यावेळी, कपिल देव धोक्याच्या बाहेर आहेत. त्यांच्यावर डॉक्टर लक्ष ठेवूनआहे. त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. कपिल देव यांचे नाव क्रिकेटच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिले आहे. कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतानं 37 वर्षांपूर्वी पहिला वर्ल्ड कप जिंकला होता.