बंगळुरू :  दुसऱ्या जातीच्या मुलासोबत आपल्या मुलीचे प्रमसंबंध असल्याने वडिलांनी आणि दोन चुलत भावांनी मिळून मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. बंगळुरूपासून ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या रामगनाग्रा जिल्ह्यात हा प्रकार उघडकीस आली. या तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
मुलीच्या वडिलांनी नऊ ऑक्टोंबरला मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. ती बी. कॉमच्या अंतिम वर्षाला शिकत होती. तक्रार नोंदवल्याच्या दुसऱ्याच दिवशी तक्रारदाराच्या भावाच्या शेतात मुलगी मृतावस्थेत आढळली. या तिन्ही आरोपींनी पोलिसांना गोंधळात टाकण्यासाठी हे हत्येचे कारस्थान रचले होते. या तिन्ही आरोपींनी आठ ऑक्टोबरला मुलीची हत्या केली. त्यानंतर मुलीचा मृतदेह शेतात पुरूला. हत्या केल्याच्या दुसऱ्या दिवशी आरोपी असलेल्या मुलीच्या वडिलांनी ती बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली, अशी माहिती पोलीस महानिरीक्षक सीमंत कुमार सिंह यांनी दिली.
हे प्रकरणर शोधून काढण्यासाठी पोलिसांनी २१ सदस्यीय पथकाची स्थापना केली होती. १० ऑक्टोबरला मुलीचा मृतदेह सापडला. कुटुंबासमोर मुलीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मुलीच्या पालकांच्या चेहऱ्यावर कुठलेही दु:खाचे भाव दिसले नाहीत. पोलिसांनी या प्रकरणी कसून चौकशी केल्यानंतर हे ऑनर किलिंगचे प्रकरण असल्याचे समोर आले.