नवी दिल्ली : कॉंग्रेस पक्षाला सातत्याने अपयश येत आहे. बिहार विधानसभा निवडणुकीतही कॉंग्रेसला अपयशाचे तोंड पहावे लागले आहे. त्यामुळे, आता कॉंग्रेच्या नेतृत्वात फेरबदल करण्यात येणार आहे. कॉंग्रेस पक्षाध्यक्ष पदाची निवडणुक लवकरच होणार असल्याचे वृत्त आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचा अध्यक्षपदाचे निवडणुक डिजीटल पद्धतीने घेण्यात येणार आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर सोनिया गांधी यांना पक्षाचे हंगामी अध्यक्ष बनवण्यात आले होते. त्यामुळे, काँग्रेसमध्ये पक्षाध्यक्षाच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. कोरोनामुळे पक्षाच्या अध्यक्ष पदाची निवडणुक डिजीटल पद्धतीने घेण्यात येणार आहे. ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या प्रतिनिधी मंडळाला डिजीटल आयडी कार्ड देण्याची तयारी सुरू झाली आहे. यासाठी सेंट्रल इलेक्शन ऑथोरिटीने मतदार यादी तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. या ऑथेरिटीने राज्यांमधील सर्व युनिट्सकडून एआयसीसी प्रतिनिधींचे डिजीटल फोटो मागीतले आहे. या निवडणुकीत सुमारे 1500 प्रतिनिधी भाग घेणार असल्याची माहिती मिळते. तर, दुसरीकडे राहुल गांधी यांना परत एकदा अध्यक्षपद देण्याची तयारी काँग्रेसमध्ये सुरू असल्याची बोलले जाते आहे. पक्षाचा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राहुल गांधी विजयी झाल्यास तेच पक्षाचे निर्विवाद नेते असून सर्वात लोकप्रिय नेते असल्याणे त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. माञ, अध्यक्षपदासाठी कॉंग्रेसमध्ये अणखी कुणी दावा केल्यास सेंट्रल इलेक्शन ऑथोरिटीला निवडणूक प्रक्रिया घ्यावी लागणार आहे.

नव्याने निवडून आलेल्या अध्यक्षाचा कार्यकाळ दोन वर्षांचा : अध्यक्षा पदाच्या निवडणुक प्रक्रियेशी संबंधित एका काँग्रेस नेत्याने अशी माहिती दिली की, आम्ही अध्यक्षपदाच्या निवडणुकीची तयारी सुरू आहे. देशातील दोन राज्य वगळता आम्ही सर्व राज्यातील काँग्रेसच्या डेलिगेट्सची यादी मागवली आहे. 2017 मध्ये ज्या पध्दतीने यादी तयार करण्यात आली होती,त्या पध्दतीने ही यादी असणार आहे. या यादीत फक्त थोड्याफार बदल असेल. या निवडणुकीत प्रत्येक डेलिगेट्सच्या आयडी कार्डमध्ये बार कोड असणार आहे. त्यात त्याची सर्व माहिती असणार आहे. हे व्होटर आयडी कार्ड लवकरच संबंधितांना देण्यात येईल. या निवडणुकीत नव्याने निवडून आलेल्या अध्यक्षाचा कार्यकाळ दोन वर्षांचा असणार आहे, असे एका काँग्रेस नेत्याने सांगितले आहे.